शंभर रुपयांचं आमिष, 10 वर्षांच्या चिमुकलीला रिक्षात ओढलं अन्…; तीन नागरिकांनी उधळला ‘तो’ भयान
छत्रपती संभाजीनगर गुन्हा: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहर परिसरातील गजबजलेल्या शाहगंज बाजारात (Shahganj Market) रात्रीच्या वेळी एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. एका अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीला शंभर रुपयांचे आमिष (Lure) दाखवून रिक्षात ओढून नेण्याचा प्रयत्न अज्ञात संशयिताकडून करण्यात आला. मात्र, स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि दाखवलेल्या धैर्यामुळे एका चिमुकलीचे प्राण व भविष्य वाचले असून अपहरणाचा हा भयानक डाव उधळला गेला आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime: तोंड दाबून रिक्षात ओढले; पाठलागाने पळापळ
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शाहगंज परिसरात रात्रीची वर्दळ असताना संशयित रिक्षाचालकाने चिमुकलीला 100 रुपयांचे आमिष दाखवून तिचे तोंड दाबले आणि तिला जबरदस्तीने रिक्षात टाकून भरधाव वेगाने पळ काढला. हा सर्व प्रकार परिसरातील तीन जागरूक नागरिकांच्या निदर्शनास आला. काहीतरी गैर घडत असल्याचे लक्षात येताच, या तिघांनीही कसलाही विचार न करता तात्काळ स्वतःच्या वाहनाने रिक्षाचा पाठलाग सुरू केला. आपला पाठलाग केला जात असल्याचे लक्षात येताच घाबरलेल्या संशयिताने रिक्षा थेट जिल्हाधिकारी कार्यालय परिसराच्या दिशेने वळवली.
Chhatrapati Sambhajinagar Crime: नालीत रिक्षा अडकली अन् आरोपी पसार
पाठलाग तीव्र झाल्यानंतर रजिस्ट्री कार्यालयाजवळ (Registry Office) चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा रस्त्यालगतच्या नालीत जाऊन अडकली. रिक्षा अडकल्याचे पाहून आणि नागरिक अगदी जवळ पोहोचल्याचे लक्षात येताच, संशयिताने चिमुकलीला तिथेच सोडले अन् रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोषागार कार्यालय परिसर रात्रीच्या वेळी अत्यंत निर्जन असतो. त्यामुळे संशयिताचा नक्की उद्देश काय होता, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime: सिटी चौक पोलिसांकडून रिक्षा जप्त; तपास सुरू
घटना घडल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. सिटी चौक पोलिसांनी (City Chowk Police Station) घटनास्थळी धाव घेत गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली आहे. पोलीस सध्या अज्ञात संशयितांचा कसून शोध घेत आहेत. या संपूर्ण थरारात आपल्या जीवाची पर्वा न करता बालकेचा जीव वाचवणाऱ्या त्या तीन धाडसी नागरिकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Comments are closed.