तरुणी थेट भिडली; आंदोलकांना घेऊन जाल तर खबरदार; पोलिस व्हॅनच्या समोर थांबली अन्…कोण आहे अहीर?
मुंबई: दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट (NEET) पेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे तीव्र पडसाद आता मुंबईतही उमटू लागले आहेत. दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बुधवारी मुंबईतील विविध भागांत विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली.
बुधवारी चेंबूर आणि दादर परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र आले होते. चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी करणारे पोस्टर्स हातात घेऊन आंदोलन केले. या आंदोलकांना पोलिसांनी स्थानबद्ध करून ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला.दुसरीकडे, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क येथेही मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली. या ठिकाणी पोहोचून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांच्या या लढ्यात मनसे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील,” अशी ग्वाही राज ठाकरे यांनी यावेळी आंदोलकांना दिली.
Mumbai Protest: ‘जेन-झी पॉवर’: मुसळधार पावसात एकटीने रोखली पोलिसांची व्हॅन!
या संपूर्ण आंदोलनादरम्यान मुंबईच्या रस्त्यावर ‘जेन-झी पॉवर’चा (Gen-Z Power) एक थक्क करणारा प्रकार पाहायला मिळाला. दादरच्या शिवाजी पार्कजवळ पोलीस स्थानबद्ध केलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना व्हॅनमध्ये बसवून नेण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी हुडी आणि कॅप घातलेली रिया अहीर ही तरुणी मुसळधार पावसात थेट पोलिसांच्या व्हॅनसमोर जाऊन उभी राहिली.
एका हाताने गाडी थांबवत तिने पोलिसांची व्हॅन पुढे जाऊच दिली नाही. तिच्या या धाडसाची आणि संघर्षाची दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली असून, एका तरुणीने एकटीने पोलीस गाडी रोखून धरल्याचा हा व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
Mumbai Protest: नेमकी कोण आहे ही ‘मुंबईची सुपरगर्ल’ रिया अहीर?
इंटरनेटवर सध्या रिया अहीरची ‘मुंबई की सुपरगर्ल’ म्हणून जोरदार चर्चा सुरू आहे. रिपोर्टनुसार, रिया अहीरच्या या धाडसी पावलामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही आंदोलक सहकाऱ्यांना सोडवून घेण्यास मदत झाली. रिया अहीर ही अभिनेत्री, मॉडेल आणि एंटरप्रेन्योर (उद्योजक) आहे. ती अनेक प्रसिद्ध म्युझिक व्हिडिओंमध्ये झळकली असून, अलीकडेच आलेले तिचे ‘दिलबरा’ हे गाणे खूप चर्चेत राहिले होते. मनोरंजन विश्वाव्यतिरिक्त रिया ‘रियासत’ (Riyasat) नावाचा स्वतःचा पर्सनलाइज्ड क्लोथिंग ब्रँड चालवते; जिथे ती स्वतः कपडे डिझाइन आणि हँडक्राफ्ट करते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर तिचे १ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
आपल्या या कृत्याबद्दल बोलताना रिया म्हणाली, “मला समजते की पोलीस त्यांचे काम करत आहेत, पण ते जबाबदारीने काम करत नाहीत. जर ते जबाबदारीने वागणार नसतील, तर एक नागरिक म्हणून आपल्याला आपल्या लोकांची जबाबदारी घ्यावीच लागेल.”
पुढे बोलताना ती म्हणाली, “मी शेतकरी नाही किंवा दलित नाही, पण दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांसोबत जे घडले ते पूर्णपणे चुकीचे होते. आम्ही मुंबईत बसून दिल्लीच्या जंतर-मंतरवर जाऊ शकत नाही. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि स्वतः जंतर-मंतरवर जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे.”
Mumbai Protest: मुंबईत ठिकठिकाणी राजकीय आणि सामाजिक आंदोलन; नेत्यांची पोलिसांत धाव
CJP (कॉक्रोच जनता पार्टी) आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ बुधवारी मुंबईत सर्वत्र संतापाची लाट पाहायला मिळाली.
काँग्रेस नेत्यांना अटक: दक्षिण मुंबईत्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल, विधिमंडळ पक्षनेते (CLP) विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री नसीम खान हे भाजप कार्यालयाकडे संविधानाची प्रत देण्यासाठी जात होते. मात्र, मरीन ड्राईव्ह/हलसबकी पोलिसांनी त्यांना वाटेतच जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसवून कोलाबा पोलीस ठाण्यात नेले.
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंची मध्यस्थी: चेंबूरमध्ये शेकडोच्या संख्येने लोक शिक्षण व्यवस्थेतील सुधारांच्या मागण्यांचे पोस्टर्स घेऊन रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. येथे मोठा गदारोळ झाल्यानंतर शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. दोन्ही नेत्यांच्या मध्यस्थी आणि हस्तक्षेपानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलकांची सुटका केली.
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Comments are closed.