तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव

सोन्याचांदीचा आजचा भाव: देशांतर्गत सराफा बाजारात आज (23 जुलै) सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. काल आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि डॉलर (Dollar) मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम तब्बल 2,100 ते 2,290 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आज सोन्याचे दर स्थिर राहिले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजचे दर जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Gold Price Today: आज 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर

आज 24 कॅरेट (24 Carat Gold) सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,46,520 रुपये इतका आहे. 22 कॅरेट (22 Carat Gold) सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,34,310 रुपये इतका आहे. तर 18 कॅरेट (18 Carat Gold) सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,09,890 रुपये इतका कायम आहे. काल झालेल्या वाढीनंतर आज या तिन्ही प्रकारच्या सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Gold Price Today: प्रमुख शहरांतील सोन्याचे दर

राष्ट्रीय राजधानी दिल्ली (Delhi) येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 1,46,670 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चेन्नई (Chennai) मध्ये स्थानिक करांमुळे देशातील सर्वाधिक दर असून 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,48,140 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. त्यामुळे चेन्नई हा सध्या देशातील सर्वात महाग सराफा बाजार ठरला आहे.

Gold Price: सोने स्वस्त का झाले नाही?

तज्ज्ञांच्या मते, मध्यपूर्व (Middle East) भागात अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव हा सोन्याच्या किंमती वाढण्यामागील प्रमुख घटक आहे. युद्धजन्य परिस्थिती किंवा भू-राजकीय तणाव वाढला की गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात. त्यामुळे सोन्याची मागणी वाढते आणि त्याचा थेट परिणाम किंमतीवर होतो. याशिवाय रुपया हा डॉलर (Dollar) च्या तुलनेत 96.53 या विक्रमी नीचांकी पातळीवर कमकुवत राहिला आहे. त्यामुळे परदेशातून होणारी सोन्याची आयात महाग झाली असून देशांतर्गत बाजारातही सोन्याचे दर उच्च पातळीवर कायम आहेत.

Silver Price Today: आज चांदीचा दर किती?

आज चांदी (Silver) च्या दरातही कोणताही बदल झालेला नाही. देशांतर्गत सरासरी बाजारात चांदीचा दर प्रति किलो 2,40,100 रुपये असून प्रति 10 ग्रॅम 2,401 रुपये इतका आहे.

Silver Price Today: प्रमुख शहरांतील चांदीचे दर

दिल्ली – 2,45,000 रुपये प्रति किलो
मुंबई (मुंबई) – 2,40,100 रुपये प्रति किलो
कोलकाता – 2,40,100 रुपये प्रति किलो
अहमदाबाद – 2,40,100 रुपये प्रति किलो
चेन्नई – 2,45,000 रुपये प्रति किलो

Gold: 22 आणि 24 कॅरेट सोनं म्हणजे नेमकं काय?

वजन मोजण्यासाठी किलो हे एकक आहे. पाणी मोजण्यासाठी लीटर या एककाचा वापर केला जातो. त्याच पद्धतीने सोन्याची शुद्धता मोजायची असेल तर कॅरेट या एककाचा वापर केला जातो. जेव्हे कॅरेट जास्त तेवढेच सोने शुद्ध असे मानले जाते. 24 कॅरेट सोने हे सर्वांत शुद्ध असल्याचे बोलले जाते. 24 कॅरेट सोनेच्या शुद्धता ही 99.9 टक्के असते. त्यामुळे या सोन्याचा भावही इतर सोन्याच्या तुलनेत अधिक असतो. 24, 22, 18, 14  अशा वेगवेगळ्या प्रकारचे सोने असते. 24 कॅरेट सोने वगळता इतर सर्व प्रकारच्या सोन्यात तांबे, चांदी असे इतर धातू मिसळले जातात. सोन्याच्या आभूषणांना मजबुती यावी म्हणून हे धातू सोन्यात मिसळले जातात. सोन्याची गुववत्ता ही बीआयएस या संस्थेतर्फे ठरली जाते. त्यामुळे हॉलमार्क असलेले सोनेच खरेदी करायला हवे, असा सल्ला दिला जातो.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर

Comments are closed.