NEET पेपरफुटीविरोधात पालिकेत जोरदार राडा, विरोधकांच्या घोषणांनी सभागृह दणाणले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

NEET पेपरफुटीविरोधात तसेच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात जोरदार आंदोलनं सुरू आहेत. त्याचे पडसाद मुंबई महानगरपालिकेतही दिसले. दिल्लीतील धडक मोर्चात व मुंबईतील शिवाजी पार्क येथे विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा विरोधकांनी सभागृहात निषेध करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी विरोधकांनी सभागृहात व सभागृहाबाहेरही जोरदार घोषणाबाजी केली.

सभागृहाचे आजच्या दिवसाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विरोधकांनी मोदी सरकार चोर है, जब जब मोदी डरता है पुलीस को आगे करता है अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले होते. त्यानंतर सभागृहाबाहेर देखील विरोधकांनी अशाच घोषणा दिल्या.

Comments are closed.