बेळगावात भाजप रस्त्यावर, राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची

बेळगाव : देशभरात नीट (NEET) पेपरफुटीवरुन केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात येत आहे. कॉकरोच जनता पार्टीने याबाबत आंदोलन सुरू केलं असून दिल्लीतील जंतर मंतरवर हे आंदोलन मोठं रुप घेत आहेत. देशभरातून आंदोलनास पाठिंबा वाढत असताना, राजकीय विरोधही या आंदोलनात सहभागी होताना दिसून येतात. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधीशांविरुद्ध घोषणाबाजी केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी, काँग्रेसविरुद्ध भाजपही (BJP) आक्रमक झाली आहे. बेळगावमध्ये (Belgaon) भाजपने राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी करत मोर्चा काढला होता. त्यावेळी, पोलिस आणि भाजप समर्थकांमध्ये चकमक उडाल्याचं दिसून आलं.

नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात देशाच्या पंतप्रधानांचा अवमान करणे, देशविरोधी घोषणाबाजी आणि भाजप आमदारावर अंडीफेक करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप भाजपच्यावतीने करण्यात आलाय. बेळगावात भारतीय जनता पक्षाच्यावती याविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. दरम्यान, यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस पक्षाच्या कृत्यविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता.

बेळगावच्या राणी चन्नम्मा चौकातून सुरू झालेला भाजपचा हा निषेध मोर्चा काँग्रेस भवनाला घेराव घालण्याच्या उद्देशाने पुढे सरकत होता. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत आंदोलकांना वाटेतच रोखले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. कार्यकर्त्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स बाजूला ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत मोर्चा रोखण्यात यश मिळवले.

दरम्यान, या आंदोलनादरम्यान भाजप नेत्यांनी काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली. दिल्ली तसेच स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या आड काँग्रेस स्वतःचे राजकीय हित साधत असल्याचा देखील आरोप त्यांनी केला

दिल्लीत आपचा कँडल मार्च; पोलीस परवानगी नाही

दिल्लीतील CJP आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आम आदमी पार्टीकडून दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसमधील आर्ट फॅकल्टी परिसरात कँडल लाईट मार्च काढण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या मार्चमध्ये सुमारे 150 जण सहभागी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, या कार्यक्रमासाठी दिल्ली पोलिसांकडे कोणतीही अधिकृत परवानगी मागितलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, परिस्थितीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.

हेही वाचा

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा मुंबईतील आंदोलनातून अभिजित दिपकेंना कॉल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे , दिपकेंचा निर्धार

Comments are closed.