या दोन ब्लड ग्रुपवाल्यांना हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका
रोजच्या बिझी लाईफस्टाईलमुळे लहान वयातच हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याचा धोका सर्वच वयोगटात वाढला आहे. कामाच्या अनियमित वेळा, अपुरी झोप, खानपानाच्या सवयी ही जरी या मागची कारण असली तरी एका संशोधनात धक्कादायक गोष्ट निदर्शनास आली आहे. ज्यात ठराविक ब्लड ग्रुप असलेल्यांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संशोधनानुसार ज्या व्यक्तींचा ब्लड ग्रुप A आणि B असतो त्यांना हृदयाशी संबंधित व्याधी होण्याची शक्यता इतर ब्लड ग्रुप असणाऱ्यांच्या तुलनेत अधिक असते असे समोर आले आहे. त्यातही विशेष करून ब्लड ग्रुप A आणि B वाल्यांना O ब्लड ग्रुपवाल्यांच्या तुलनेत ८ टक्के हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. तसेच A ब्लड ग्रुपवाल्यांना हार्ट फेलियरचा धोकाही ११ टक्क्यांनी जास्त असतो. आणि B ब्लड ग्रुपवाल्यांना हार्ट अटॅकची जोखीम १५ टकक्यांनी अधिक असते.
A आणि B ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींमध्ये रक्ताच्या गुठळ्या बनण्याची शक्यता अधिक असते. संशोधनानुसार या दोन ग्रुपवाल्यांमध्ये O ब्लड ग्रुपवाल्यांच्या तुलनेत रक्त गोठण्याची शक्यता जवळजवळ ४४ टक्के असते. ज्यावेळी रक्ताच्या गुठळ्या धमन्यांमध्ये जाऊन ब्लॉकेजेस तयार करतात त्यावेळी हार्ट अटॅक येतो.
पण याचा अर्थ असा नाही की वरील दोन्ही ब्लड ग्रुप असणाऱ्यांना हार्ट अटॅक .येणारच. पण या व्यक्तींनी सावध राहणे आणि योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
Comments are closed.