CWG 2026 – श्रीहरी नटराज उपांत्य फेरीत
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या दुसऱया दिवशी हिंदुस्थानी जलतरणपटूंनी दमदार कामगिरी केली. श्रीहरी नटराज हा पुरुषांच्या 50 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. पॅरा-जलतरणात, भारताचे आरव्हीव्हीबीके बुडीगिना आणि इमाम अली पुरुषांच्या 100 मीटर फ्रीस्टाइल प्रकाराच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.
हिंदुस्थानी जलतरणपटू श्रीहरी नटराज शुक्रवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात संयुक्तपणे 14 व्या स्थानावर राहिला. दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेला आणि अनेक राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर असलेल्या नटराजने 25.52 सेकंदांची वेळ नोंदवून बर्म्युडाच्या जॅक हार्वे यांच्यासोबत संयुक्तपणे 14 वे स्थान मिळवले. प्राथमिक फेऱयांमधील अव्वल 16 जलतरणपटू उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. नटराज त्याच्या आठ जणांच्या हीटमध्ये पाचव्या स्थानी राहिला.
Comments are closed.