राहुल गांधी आक्रमक, विद्यार्थ्यांच्या तीन नव्या मागण्या मांडल्या, थेट पंतप्रधान मोदींच्या माफीच

राहुल गांधी विद्यार्थ्यांचा निषेध: नीट पेपरफुटी प्रकरणावरुन दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरु असलेल्या विद्यार्थी आणि कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे केंद्र सरकार गेल्या 12 वर्षातील सर्वात मोठ्या कोंडीत सापडले असताना आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सरकारवरील दबाव आणखीनच वाढवला आहे. राहुल गांधी यांनी शनिवारी नवी दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांसोबत (Students Protest) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या तीन महत्त्वाच्या मागण्या प्रसारमाध्यमांसमोर मांडल्या. या तीन मागण्यांबाबत कोणतीही तडजोड किंवा चर्चा होणार नाही, असे राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले. (Delhi Jantar Mantar Protest)

राहुल गांधी यांनी म्हटले की, आंदोलक विद्यार्थ्यांच्या तीन मागण्या आहेत. पहिली मागणी ही आहे की, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) हे भ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम आहेत. त्यांना मंत्रिपदावरुन दूर करावे. केंद्र सरकारमध्ये अशी चर्चा सुरु आहे की, धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून शिक्षण खाते (Education Ministry) काढून त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात दुसरे एखादे खाते द्यावे. पण हे विद्यार्थी आणि देशातील नागरिकांना मान्य नाही. धर्मेंद्र प्रधान हे भ्रष्टाचाराचे प्रतीक आहेत. देशाचे भविष्य असणाऱ्या शिक्षणक्षेत्राचा त्यांनी विध्वंस केला. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना दुसरे कोणतेही खाते देऊ नये. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर ठेवावे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.  विद्यार्थ्यांची दुसरी मागणी म्हणजे, दिल्ली पोलिसांच्या लाठीमारात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांची डोकी फुटलेत, पाय तुटले आहेत, काहीजण पेलेट गनमुळे जखमी झाले आहेत. या सगळ्यासाठी आदेश देणाऱ्यांना आणि तो अंमलात आणणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. पंतप्रधान मोदी हे या सगळ्या यंत्रणेचे प्रमुख आहेत. विद्यार्थ्यांच्या आणि देशाच्या भविष्यासोबत जो काही खेळ झाला, त्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली पाहिजे. या विद्यार्थ्यांच्या तीन मागण्या असून त्याबाबत कोणतीही चर्चा होऊ शकत नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

तिसरी मागणी म्हणजे जे संपूर्ण देशाची व्यवस्था चालवत आहेत, पंतप्रधान मोदी, जे रात्रभर व्हिडीओ तयार करत आहेत. काल व्हिडीओ शेअर केला की, विद्यार्थ्यांच्या खूप चांगल्या सूचना आल्या. या विद्यार्थ्यांना सूचनांशी देणेघेणे नाही, त्यांची मागणी सूचनांची नाही. त्यांची मागणी धर्मेंद्र प्रधान यांना मंत्रिपदावरुन  दूर करावे, ही आहे. या सगळ्या यंत्रणेच्या प्रमुखाने विद्यार्थ्यांची माफी मागावी. विद्यार्थ्यांना मारण्यात आलंय, त्यांचा अपमान करण्यात आला, हे मान्य करावे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. मला प्रत्येक विद्यार्थ्याचा अभिमान आहे, जो संविधानाकडून सरकारकडून होणारा हल्ला, यंत्रणांवर होणारा हल्ला, या सगळ्याचा विरोध करत आहे.

आणखी वाचा

Sanjay Raut on PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी सलग दोन रात्री इन्स्टाग्रामवर फ्रंट कॅमेऱ्याने शूट करुन व्हिडीओ टाकले, संजय राऊत म्हणाले, ‘ते कधीच तुमचे फ्रेंड होणार नाहीत’

Mohan Bhagwat On Protest : ‘नवीन पिढी प्रश्न विचारतेय, त्यांना तर्कशुद्ध उत्तर घ्यायला हवं, आपलेपणाची भावना हवी’; विद्यार्थी आंदोलनावरून सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.