वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात; मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांच्या सुरक्षेत वाढ
NEET महाराष्ट्र निषेध: दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून सर्वाधिक बळं मिळालं आहे. मुंबईपासून ते पुण्यापर्यंत ते संपूर्ण महाराष्ट्रात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी राज्यभर सतर्कतेचा इशारा देण्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, मंत्री, आमदार आणि महत्त्वाच्या शासकीय इमारतींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
वर्षा निवासस्थानी अतिरिक्त बंदोबस्त तैनात
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’वर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याही शासकीय निवासस्थानाची सुरक्षा वाढविण्यात आली असून, मंत्री, खासदार आणि आमदारांच्या निवासस्थानी सुद्धा अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आला आहे. इतकेच नाही, तर मंत्रालय परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी ‘एसआरपीएफ’च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
गद्दार मंडळीनी तर भुमिगत व्हावे
दरम्यान, वाढवण्यात आलेल्या बंदोबस्तावर खासदार संजय राऊत यांनी खोचक टिप्पणी केली आहे. राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, गृहमंत्री म्हणून देवेंद्रजी यांनी घेतलेला आता पर्यंतचा visionery निर्णय आहे. सर्व मंत्री व सरकारी आमदार खासदाराना माझी ही विनंती आहे बाहेर फिरू नका, घरीच रहा धोका पत्करू नका, बाहेर वादळ घोंगावत आहे. गद्दार मंडळीनी तर भुमिगत व्हावे.
मुंबईत ऐतिहासिक ‘तिरंगा मोर्चा’
दुसरीकडे, राजधानी मुंबईत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेकडून शिवाजी पार्कवर तिरंगा मार्च काढण्यात आला. यात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न वापरता केवळ राष्ट्रध्वज तिरंगा हातात घेऊन हजारो तरुण सहभागी झाले होते. आमदार आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोन्ही युवा नेत्यांनी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर एकत्र येत व्यासपीठ शेअर केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी “केंद्राकडे लाठ्या आणि अश्रूधूर असतील, पण आमच्या विद्यार्थ्यांच्या हातात राष्ट्रध्वज आहे,” अशा शब्दांत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. तर अमित ठाकरे यांनी विद्यार्थी आंदोलकांवरील पोलीस कारवाई तातडीने मागे घेण्याची मागणी केली.
राज्यातील इतर शहरांतही आंदोलनाचा वणवा
दिल्लीतील कारवाईचे पडसाद केवळ मुंबई-पुण्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये उमटले आहेत. नागपूरमध्येही विविध विद्यार्थी संघटनांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली आणि शिक्षण मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. नाशिकमध्येही शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत रात्री कॅन्डल मार्च काढून दिल्लीतील जखमी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवेदना व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगरमध्येही क्रांती चौकात विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन झाले, ज्याला काँग्रेस, डावे पक्ष आणि AIMIM च्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला.
इतर महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Comments are closed.