आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक

बिहार विद्यार्थ्यांचा निषेध: नीट पेपरफुटी, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि लाठीचार्जच्या विरोधात पुकारलेला बिहार बंद आता हिंसक वळण घेत आहे. सिवानमध्ये आंदोलकांनी जोरदार दगडफेक केली आणि पोलिसांवर हल्ला केला. सुरुवातीला जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. 10 हून अधिक फैरी झाडण्यात आल्या. एका आंदोलकाने फेकलेल्या दगडाने सिवानचे एसपी पुरण झा यांच्या हाताला दुखापत झाली. पाटणा, छपरा, सिवान, भागलपूर, औरंगाबाद, सीतामढी, बेतिया आणि लखीसराय यांसह राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये दगडफेक झाली. तेज प्रताप यादव यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

न्यायाधीशांची गाडीही अडकली

दरम्यान, छपरामध्ये विद्यार्थ्यांनी एका सरकारी इमारतीवर चढून आणि पोस्टर्स फाडून हिंसक आंदोलन केले. ते बॅरिकेड्स घेऊन पळून जाताना दिसले. मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले आणि एका न्यायाधीशांची गाडीही अडकलेली दिसली. भागलपूरमध्येही अशांतता होती. दगडफेकीनंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. विद्यार्थी पोलिसांच्या वाहनावर विटा फेकताना दिसले. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, मधेपुरामध्ये विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली, ज्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. बेगुसराईवर पाळत ठेवण्यासाठी पोलीस ड्रोनचा वापर करताना दिसले.

पाटण्यात दगडफेक

AISA आणि राष्ट्रीय युवा आंदोलन (RYA) या विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या बिहार बंदचा परिणाम आता जाणवू लागला आहे. पाटण्याच्या गांधी मैदानाजवळ मोठ्या संख्येने विद्यार्थी जमले होते. आंदोलकांनी रामगुलाम चौकाजवळील एका मोबाईल टॉवरवर चढाई केली. तेज प्रताप यादव तिरंगा फडकवतानाही दिसले. त्यानंतर विद्यार्थी डाकबंगला चौकाच्या दिशेने निघाले. त्यांना बॅरिकेड्स लावून थांबवण्यात आले, त्यानंतर आंदोलकांनी दगडफेक सुरू केली. पोलीस आंदोलकांना सातत्याने पिटाळून लावत आहेत.

सुरक्षेसाठी 70,000 जवान तैनात

बिहार बंदच्या पार्श्वभूमीवर पाटणा येथील पोलीस आणि प्रशासनाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. संपूर्ण बिहारमध्ये 70,000 जवान तैनात करण्यात आले आहेत. राज्यात पोलिसांची रजा रद्द करण्यात आली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाटणा आणि औरंगाबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त, सीआयएसएफ, बीएसएफ, एसएसबी आणि सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. जेपी गोलंबर येथे वॉटर कॅननसह 200 जवान तैनात करण्यात आले आहेत. विधानसभा आणि पाटणा जंक्शन परिसरातही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. विमानतळ, राजेंद्रनगर टर्मिनल आणि संग्रहालय यांसारख्या इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणीही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या बंदला आरजेडी, काँग्रेस, व्हीआयपी आणि डाव्या पक्षांकडून पाठिंबा मिळाला आहे.

आंदोलनातील ठळक घडामोडी

  • सिवानमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीत पोलीस अधीक्षक जखमी
  • सिवानमधील हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी थेट 10 राऊंड फायरिंग
  • पाटणामध्ये दगडफेकीनंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
  • पोलिसांनी तेज प्रताप यादव याना ताब्यात घेतले.
  • छपरा येथे आंदोलकांनी दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.
  • भागलपूरमध्ये विद्यार्थ्यांनी दगडफेक करून पोलिसांच्या वाहनाचे नुकसान केले.
  • औरंगाबादमध्येही आंदोलकांनी दगडफेक केली.
  • सीतामढीमध्येही विद्यार्थ्यांनी दगडफेक केल्याने गोंधळ उडाला.
  • सीतामढीमध्ये एसपी अमित रंजन यांच्या पायाला दुखापत झाली.
  • मधेपुरा येथे 20 हून अधिक विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.