धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपकेंच्या आई- वडिलांची पहिली प्रतिक्रिया

धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यावर अभिजीत डिपकेच्या पालकांची प्रतिक्रिया: गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (Cockroach Janta Party) आंदोलनाला अखेर आज यश मिळाले आहे.   20 जुलै रोजी जंतर मंतर येथे युवकांनी (Dharmendra pradhan) संसदभवनाबाहेर आंदोलन छेडलं होतं. नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी युवकांनी आंदोलन पुकारलं होतं.   अखेर आज (शनिवारी) धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रि‍पदाचा  राजीनामा दिला.  त्यांनी आपल्या  अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला (Abhijeet Dipke) असल्याची माहिती दिली.  कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांसह आंदोळनस्थळी असलेल्या आंदोलकांनी जल्लोष साजरा केला. अशातच अभिजीत दिपके यांच्या आई – वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.  ‘डोळ्यात आनंदाश्रू आहे’, असं अभिजीत दिपकेंच्या आईने एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

अभिजीत दिपकेंच्या आईची पहिली प्रतिक्रिया (Abhijeet Dipkes Parents First reaction on Dharmendra pradhan reaction)

अभिजीत दिपकेंच्या  आई वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली. अभिजीत दिपकेंची आई म्हणाली, ‘खूप आनंद झाला आहे. त्याच्या प्रामाणिकपणाला यश आलंय. आम्हाला रात्रीची झोप नाही यायची. सकाळी फोन हातात घ्यावा की नाही, अशी भीती होती, कारण कोणती वाईट रिल समोर येईल, अशी भीती मनात होती.  मी त्याच्या मित्रांना अभिजीत विषयी विचारायची. त्याचे मित्र मला धीर द्यायचे.  म्हणायचे की, अभिजीतच्या मागे ठामपणे उभे राहा. तुम्हाला काही झालं तर, तो  इमोशनल होतो, असं मित्र म्हणायचे’.

‘आधी अभिजीतची चिंता वाटायची. आता डोळ्यात आनंदाश्रू आहेत. आता त्याने लवकरात लवकर घरी यावं.  तो घरी आल्यावर अभिजीतला मिठी मारणार. ओवाळणार.  त्याने मागच्या वेळेस ओवाळू दिलं नाही. मला  म्हणाला की, मम्मी मी काही मोठा पराक्रम केलेला नाही.  पण आता त्याला ओवाळणर’, असं अभिजीत दिपकेंच्या आई म्हणाल्या. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनाम्यावर अभिजीत दिपकेंची आई म्हणाली, ‘हे सगळ्या मुलांचं यश आहे. जेवढं आंदोलनाला प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष उपस्थित होते, त्या सगळ्यांचे हे यश आहे’.

अभिजीत दिपकेंच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया (Abhijeet Dipke Fathers First Reaction on Dharmendra Pradhans Resignation)

अभिजीत दिपके आणि संपूर्ण आंदोलकांना मिळालेल्या यशानंतर अभिजीत दिपकेंच्या वडिलांनीही एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.  ‘त्यांच्या मागणीला यश मिळालं आहे.  आम्हाला राजकारणातलं फारसं माहित नाही.  माझ्या इच्छेविरुद्ध जाऊन मुलानं ही मुव्हमेंट सुरु केली.  समाजकारणात उतरल्यामुळे मी खूप चिंतेत होतो.   धर्मेंद्र प्रधान यांनी मनाचा खूप मोठेपणा दाखवला आहे.  त्यांच्या राजीनाम्यात त्यांनी म्हटलं की, विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सोडून द्यावं.  शिक्षणाकडे लक्ष द्यावं.  आजकाल कुणी सरपंचाची खुर्ची सोडत नाही. एवढं मोठं पद सोडणं, हे खरंच त्यांच्या मनाचा  मोठेपणा आहे.   पद सोडतानाही त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार केला आहे, ही फार मोठी गोष्टी आहे.  या घटनेकडे कुणीही जय किंवा पराजय या दृष्टिकोनातून पाहू नये’, असं अभिजीत दिपकेंचे वडील म्हणाले.

‘त्याने 2 ते अडीच वर्ष केजरीवाल यांच्याकडे काम केलं. त्याने राजकारण खूप जवळून बघितलं आहे.  मला राजकारण आवडत नाही.  पण त्याचा जो काही निर्णय असेल, त्याच्या पाठीशी मी असेन’, असंही अभिजीत दिपकेंचे वडील म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला, जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

Comments are closed.