शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan Resign) यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांच्याकडे सोपवला आहे. ‘NEET-UG’ परीक्षेत झालेल्या गोंधळावरून देशभरात सुरू असलेला विवाद आणि जंतर-मंतर येथील विद्यार्थ्यांचे आंदोलन या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan Resign) यांनी सोशल मीडियावर याची घोषणा करत राजीनामा देण्यामागील कारणही स्पष्ट केले आहे. तर प्रधान यांच्या राजीनाम्यावरती शिवसेना ठाकरे गटाची आणि मनसेची संयुक्तपणे पत्रकार परिषद घेण्यात येत आहे. यावेळी पत्रकार परिषदेवेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गेले काही दिवस आपला देश अस्वस्थ आहे, याचे कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. अभिजीत दिपके आणि सगळ्या तरुणांचे आणि पालकांचे अभिनंदन. हा विषय फक्त राजीनाम पर्यंत नव्हता. गेले १२ वर्ष रोज काही तरी सुरू होते. नोटबंदी असेल किंवा काही. देशात जनता राहिली नाही असे हे लोक वागत आहे. हे सगळे झुरळ आहे असे सरकार बघत होते. मला डायलॉग आठवला एक मच्छर आदमी को.. तसे एक झुरळाने देश झुकविला. मी अभिनीत दिपकेचं ट्वीट पाहिले की, हे आंदोलन मागे घेतले नाही. महत्त्वाची मागणी होती ती राजीनाम्याची…आता राजीनामा दिला आहे की, खाते बदल झाला आहे हे स्पष्ट नाही. आता हे झाले त्याच्या पुढे काय? असा सवालही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
धर्मेंद्र प्रधान राजीनाम्यावर उद्धव ठाकरे: राजीनाम्यात विलंबाचे खाते बदलणार?
तर ज्या तरुणाला झुरळ म्हटलं त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की, आपण केवळ खुर्चीत बसलोय म्हणून डोक्यात माज आलाय असं वागू नका. देशातली युवाशक्ती ही जर का एकत्र आली तर काय करू शकते, त्याची ही झलक आहे. मी आपल्यासमोर किंवा आम्ही सगळे आपल्यासमोर येण्यापूर्वी अभिजीत दीपकेचं एक ट्वीट पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की आंदोलन अजूनही आम्ही मागे घेतलेलं नाही, कारण अजून दोन मागण्या त्यांच्या बाकी आहेत. महत्त्वाची मागणी होती ती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची. आता त्यांनी राजीनामा दिलाय का त्यांचा खातेबदल केलाय याच्यावरती अजून काही स्पष्टता नाही, पण त्यांनी राजीनाम्याचं पत्र हे सर्व माध्यमांसमोर दिलेलं आहे. आता हे झाल्यानंतर याविषयी जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचं पुढे काय होणार? कारण या आंदोलनाच्या दरम्यान भाजप सरकारचा एक बीभत्स, भीषण, गुन्हेगारी प्रवृत्तीचा चेहरा हा संपूर्ण जगासमोर आलेला आहे. ज्या पद्धतीने तरुणांवरती लाठ्या चालवल्या गेल्या, ज्या पद्धतीने तिथे आलेल्या युवतींवरती हात उचलला गेला… आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा एक ती युवती अत्यंत व्यथित होऊन, व्याकुळ होऊन सांगत होती की तिच्या कपड्याला सुद्धा हात घातला गेला अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
Uddhav Thackeray on Dharmendra Pradhan Resign: अमित शहांनी सांगितलं पाहिजे…
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आता या पोलिसांवरती कोण गुन्हे दाखल करणार? आणि साध्या वेषातले जे गुंड तिकडे घुसवले गेले होते, त्यांना शोधून त्यांच्यावरती कारवाई करणार की नाही? आणि एकूणच या विद्यार्थ्यांवरती जर कुठे गुन्हे दाखल केले गेले असतील, तर हे मागे घेणार आहेत की नाही, हे आता अमित शहांनी सांगितलं पाहिजे. कारण या पोलिसांवरती ज्यांनी दंडुकेशाही केली, या तरुणांवरती लाठ्या-काठ्या चालवल्या, त्यांच्यावरती जर का कारवाई होणार नसेल, तर मग कदाचित ही तरुणाई आता धर्मेंद्र प्रधानांकडून अमित शनांकडे त्यांचा मोर्चा वळवल्याशिवाय राहणार नाही.
Uddhav Thackeray on Dharmendra Pradhan Resign: देशामध्ये अजून क्रांतीची ठिणगी विझलेली नाही
असो, मला असं वाटतं की या तरुणांना खास धन्यवाद दिले पाहिजेत. याचं कारण असं परत एकदा सांगतो की, या देशामध्ये जणू काही आता लोक राहतच नाहीत, ही सगळी झुरळं आहेत आणि आपण काही केलं, कशीही मस्ती दाखवली तरी हे चालवून घेतलं जातं, हा जो काही एक समज किंवा हा जो एक भ्रम भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मस्तवाल सत्ताधाऱ्यांनी निर्माण केला होता, ते चित्र यांनी भुईसपाट करून टाकलेलं आहे. म्हणून यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की या देशामध्ये अजून क्रांतीची ठिणगी विझलेली नाही.असंही पुढे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
Uddhav Thackeray on Dharmendra Pradhan Resign: प्रधानांकडून शाहांकडे त्यांचा मोर्चा वळवल्याशिवाय राहणार नाही
तरुणांवरती लाठ्या-काठ्या चालवल्या त्यांच्यावरती जर का कारवाई होणार नसेल, तर मग कदाचित ही तरुणाई आता धर्मेंद्र प्रधानांकडून अमित शहांकडे त्यांचा मोर्चा वळवल्याशिवाय राहणार नाही. असो, मला असं वाटतं की या तरुणांना खास धन्यवाद दिले पाहिजेत. याचं कारण असं परत एकदा सांगतो की, या देशामध्ये जणू काही आता लोक राहतच नाहीत, ही सगळी झुरळं आहेत आणि आपण काही केलं, कशी मस्ती दाखवली तरी हे चालवून घेतलं जातं, हा जो काही एक समज किंवा हा जो एक भ्रम भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मस्तवाल सत्ताधाऱ्यांनी निर्माण केला होता, ते चित्र यांनी भुईसपाट करून टाकलेलं आहे. म्हणून यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की, या देशामध्ये अजूनही क्रांतीची ठिणगी विझलेली नाही. अजूनही क्रांतिकारक जन्माला येऊ शकतात, त्याची एक चुणूक या निमित्ताने संपूर्ण जगाला आपल्या देशातल्या तरुणांनी दाखवून दिलेली आहे, असंही पुढे उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
Uddhav Thackeray on Dharmendra Pradhan Resign: युवाशक्तीची ताकद मोठ्या प्रमाणावरती उद्या मुंबईतून…
उद्याचा मार्च नक्की होणार आहे, कारण हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. अनेक वर्षांनंतर लोक आपल्या भावना व्यक्त करायला लागलेले आहेत आणि मी तमाम जनतेला आवाहन करतो. जसं काल सुद्धा आपण पाहिलं असाल की आम्ही असा विचार केला होता की उद्या जर का आम्ही मोर्चा काढतोय, तर कालचा कार्यक्रम कशाला करायचा? पण हे जाहीर झाल्याबरोबर आदित्यला काय, अमितला काय, असंख्य लोकांनी संदेश पाठवले आणि सांगितलं की नाही, आम्ही उद्या पण येणार आणि रविवारी पण येणार! आता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे, त्याच्यामुळे ही युवाशक्तीची ताकद मोठ्या प्रमाणावरती उद्या मुंबईतून तमाम जनतेला किंवा तमाम दुनियेला आपण दाखवली पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं आहे.
म्हणून उद्याचा जो काही मोर्चा आहे, त्या मोर्चाच्या ऐवजी आपण काय नेमकं करतो ते राज सांगेल. पण उद्याचा कार्यक्रम हा असाच राहील जसा पहिला ठरवला होता, तसाच तिकडेच जमू. पुढचं राज सांगेलच, पण या पुढच्या आंदोलनाची दिशा मी अभिजीतला सांगणार आहे. कारण त्याच्याबरोबर मी फोन करण्याचा प्रयत्न करतोय, कदाचित तिथलं नेटवर्क जाम झालं असू शकेल किंवा तिथे जॅमर लावले असतील. त्यांच्याशी बोलून अभिजीत आणि त्याचे सहकारी काय ठरवतील, त्याच्याप्रमाणे सगळेजण पुढे जातील. उद्या शिवाजी पार्क मैदानामध्ये वीर सावरकर मार्गावरती तिथेच व्यासपीठ असेल अशी माहिती ठाकरेंनी दिली.
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Comments are closed.