आषाढी एकादशीला विठुरायाच्या पंढरीत अनर्थ घडला, वारीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या SRPF जवानाने स्वत
Pandharpur Crime News: आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) पावन पर्वावर संपूर्ण पंढरपूर (Pandharpur) विठ्ठलमय झाले असतानाच एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. वारीसाठी आलेल्या लाखो वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील (SRPF) एका जवानाने स्वतःवर बंदुकीने गोळ्या झाडून आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे पंढरपूरसह पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
Pandharpur Crime News: पहाटेच्या महापूजेच्या वेळीच दुर्दैवी घटना
रामेश्वर ध्रुपद साबणे असे जीवन संपवणाऱ्या 30 वर्षीय एसआरपीएफ जवानाचे नाव असून ते मूळचे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवासी होते. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास, ज्या वेळी श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा सुरू होती, त्याच सुमारास रामेश्वर यांनी स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून गोळ्या झाडून हे टोकाचे पाऊल उचलले.
पंढरपूर क्राईम न्यूज : कारण अद्याप अस्पष्ट
गोळीबाराचा आवाज होताच परिसरात तैनात असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने रामेश्वर साबणे यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांनी ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
Comments are closed.