देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या ‘
देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस: दिल्लीच्या जंतर मंतर येथे सुरु असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे लोण देशभरात वेगाने पसरत असल्याचे लक्षात येताच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan Resignation) यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी सोशल मीडियावरुन एक पत्र शेअर करत आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. हे अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे मोठे यश मानले जात आहे. 2014 साली पंतप्रधान मोदी (पीएम मोदी) सत्तेत आल्यापासून एखाद्या आंदोलनामुळे किंवा आरोपांमुळे एखाद्या केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आता देशाचा नवा शिक्षणमंत्री कोण होणार, याबद्दल आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देशाचे नवे शिक्षणमंत्री होऊ शकतात, असा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पहाटे पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची महापूजा केली होती. यावेळी त्यांची पत्नी अमृता फडणवीस यादेखील त्यांच्यासोबत होत्या. या महापूजेपूर्वी अमृता फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांविषयी विचारणा करण्यात आली. यावर अमृता फडणवीस यांनी म्हटले होते की, नाही, आम्हाला, मला महाराष्ट्रातच राहायचं आहे. मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. त्यावेळी हे वक्तव्य फारसे गांभीर्याने घेतले गेले नसले तरी त्यानंतर काही तासांतच देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला बोलावण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस दुपारी एकच्या सुमारास सोलापूरमधून दिल्लीला रवाना झाले. ते काहीवेळापूर्वीच दिल्लीत दाखल झाले आहेत. केंद्रीय नेतृत्त्वाने फडणवीसांना दिल्लीत का बोलवले असावे, याची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Sanjay Raut: संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
कदाचित असंही वाटतंय की धमेंद्र प्रधान यांच्या जागी नवीन शिक्षणमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना संधी मिळू शकते. कारण ते वकील आहेत, उच्चशिक्षित आहेत. ते अनेक विषय मांडत असतात. ते केंद्रामध्ये जाण्यासंदर्भात सातत्याने चर्चा होत असते. आता योगायोगाने किंवा फडणवीसांच्या दुर्दैवाने, त्यांना केंद्रात संधी मिळू शकते, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले.
आणखी वाचा
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Comments are closed.