IND vs ZIM: वैभव सूर्यवंशीबाबत टीम इंडियाच्या नेमक्या योजना काय? हंगामी गोलंदाजी प्रशिक्षकाचा मोठा खुलासा
भारत आणि जिम्बाब्वे (T20 Series between india vs Zimbabwe) यांच्यात खेळल्या जात असलेल्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना हरारे येथे 25 जुलैला खेळला जात आहे. या मालिकेत पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष टीम इंडियाचा 15 वर्षीय युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याच्यावर आहे.
पहिल्या टी-20 सामन्यात वैभवने तुफानी फलंदाजी करत 19 चेंडूंत 50 धावांची खेळी केली, याद्वारे त्याने आपल्या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले. वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 44 चेंडूंचा सामना करून 92 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, यातील 74 धावा फक्त चौकार-षटकारांमधून केल्या असून, त्यात 9 षटकारांचा समावेश आहे. दुसऱ्या सामन्यात मात्र तो 20 धावांवर बाद झाला.
तत्पूर्वी, आता वैभवबद्दल टीम इंडियाचे हंगामी गोलंदाजी प्रशिक्षक सुनील जोशी (Sunil Joshi on Vaibhav Suryavanshi) यांचं मोठं वक्तव्य समोर आलं असून, त्यांनी या युवा खेळाडूबाबतच्या भविष्यातील योजनेचा देखील खुलासा केला आहे.
भारतीय संघ 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी हंगामी सपोर्ट स्टाफसह जिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे, ज्यामध्ये सुनील जोशी हे गोलंदाजी प्रशिक्षकाची धुरा सांभाळत आहेत. दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुनील जोशी यांना वैभव सूर्यवंशीच्या भविष्यातील योजनेबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले की, माझ्या मते त्याला सर्वात आधी एक फलंदाज म्हणून पाहिले पाहिजे, सध्या त्याला फक्त आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. मला आनंद आहे की तो चांगली कामगिरी करत आहे आणि उर्वरित दोन्ही सामन्यांमध्येही तो आपली ही लय कायम ठेवेल. त्याला जिम्बाब्वेमध्ये खूप यश मिळाले आहे, तसेच अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही वैभवने शानदार कामगिरी केली होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्हाला जेव्हाही वेळ मिळेल, तेव्हा मी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (सेंटर ऑफ एक्सलन्स) त्याच्या गोलंदाजीवर काम करीन.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये (IPL) वैभव सूर्यवंशीला अजून गोलंदाजी करताना पाहिले गेलं नसलं, तरी त्याने अंडर-19 क्रिकेट आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डावखोऱ्या हाताचा पार्ट-टाईम फिरकी गोलंदाज म्हणून भूमिका बजावली आहे. वैभवच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2 विकेट्स देखील नोंदवल्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत, भविष्यात तो आपल्या गोलंदाजीत सुधारणा करून टीम इंडियासाठी एक चांगला ‘स्पिन अष्टपैलू’ (स्पिन ऑलराउंडर) खेळाडूचा पर्याय बनू शकतो.
Comments are closed.