परदेशी लीग्जवर बंदी तरीही भारतीय खेळाडू इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट कसे खेळतात? जाणून घ्या नियम!
इंग्लंडमध्ये 21 जुलैपासून वन-डे कप सुरू झाला होता, ज्यामध्ये अनेक भारतीय क्रिकेटपटू खेळत आहेत. कुलदीप यादव, आशुतोष शर्मा यांच्यापासून ते युझवेंद्र चहलसुद्धा या स्पर्धेत खेळत आहेत. सहसा बीसीसीआय (BCCI) आपल्या खेळाडूंना परदेशी लीग्जमध्ये खेळण्याची परवानगी देत नाही, मग तरीही अनेक भारतीय क्रिकेटपटू या वन-डे कपमध्ये कसे खेळत आहेत?
कुलदीप यादव यॉर्कशायरकडून खेळत आहे, तर आशुतोष शर्माने नुकतीच हॅम्पशायरकडून खेळताना गोलंदाजीत ४ बळी (विकेट्स) घेतले आहेत. दुसरीकडे युझवेंद्र चहलने या हंगामात नॉर्थम्प्टनशायरच्या संघात पुनरागमन केले आहे. भारतीय खेळाडू कोणत्या नियमांतर्गत इंग्लंडमध्ये जाऊन वन-डे कप खेळत आहेत, ते येथे जाणून घ्या.
बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये असलेले आणि त्याबाहेरील इतर भारतीय क्रिकेटपटूही इंग्लंडमध्ये जाऊन काउंटी क्रिकेट किंवा तेथील लिस्ट-ए (List-A) स्पर्धांमध्ये खेळू शकतात. मात्र, यासाठी बीसीसीआयचकडून ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ म्हणजेच NOC (No-Objection Certificate) मिळवणे बंधनकारक असते.
परंतु जर एखाद्या भारतीय क्रिकेटपटूला परदेशी टी-20 फ्रेंचायझी लीगमध्ये भाग घ्यायचा असेल, तर बीसीसीआय त्याला तसे करण्याची परवानगी देत नाही. कोणताही भारतीय क्रिकेटपटू निवृत्ती घेतल्यानंतरच परदेशी फ्रेंचायझी लीग्जमध्ये खेळू शकतो. उदाहरणार्थ, बिग बॅश लीगच्या (BBL) नुकत्याच झालेल्या हंगामात रविचंद्रन अश्विन सिडनी थंडरकडून खेळणार होता, परंतु दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही.
भारताचे अनेक क्रिकेटपटू पूर्वीपासून काउंटी क्रिकेट खेळत आले आहेत. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, उमेश यादव, ईशांत शर्मा, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यापासून ते सुनील गावस्कर यांनीही आपल्या काळात इंग्लंडमध्ये जाऊन काउंटी क्रिकेट खेळले होते. सध्या इंग्लंडच्या वन-डे कपमध्ये कुलदीप यादव, युझवेंद्र चहल आणि आशुतोष शर्मा खेळत आहेत.
Comments are closed.