देवेंद्र फडणवीसांकडे केसाने गळा कापण्याचं कौशल्य, केंद्रात गेल्यास..; हर्षवर्धन सपकाळांची टीका

देवेंद्र फडणवीसांवर हर्षवर्धन सपकाळ केसाने गळा कापण्याचं कौशल्य देवेंद्र फडणवीस यांच्यात असल्याने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) केंद्रात गेल्यास ते धर्मेंद्र प्रधानांपेक्षाही ‘चांगलं कंट्रोल केंद्रात करू शकतील, असा खोचक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी लगावला आहे. आगामी काळात एक घटना अशी होईल की देशाचं राजकारण पूर्णतः बदलून जाईल. 2029 नंतर नरेंद्र मोदी राष्ट्रपती होतील व अमित शहा पंतप्रधान होतील असं वातावरण सध्या निर्माण केलं जात असल्याचेहे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. देशातील परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा मलिन होते आहे. तर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची (Dharmendra Pradhan Resignation) मागणीची ‘भीमगर्जना’ राहुल गांधींनी सर्वात आधी केली होती. असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

दरम्यानदेशात झालेल्या आंदोलनामुळे सरकारचा अहंकार हा झुकला आहे. मात्र यामुळे जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा मलिन झाल्याची टीकाहे सपकाळ यांनी केली आहे. फक्तसीजेपीच्या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर राहुल गांधी यांनी अभिजीत दिपके किंवा cjपीचं एकदाही नाव घेऊन त्यांच अभिनंदन केलेल नाही. या प्रश्नाचं सरळ उत्तर देणे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी टाळलेल आहे.

Harshvardhan Sapkal : आम्ही म्हणजे ईश्वर आहोत असा मोदी सरकारचा भ्रम

नैतिकतेने राजीनामा देणे याची पद्धत लाल बहादूर शास्त्री यांनी सुरू केली. मात्र मोदी आल्यापासून हेखेखोर शाही सुरू झाली. पेपर लीके हे सरकारने केले व विशिष्ट क्लासेसला त्यांनी ते वितरित केले. त्या बदल्यात फार मोठी रक्कम जमा करत होते. आम्ही म्हणजे ईश्वर आहोत असा भ्रम मोदी सरकारचा होता. धर्मेंद्र प्रधानांनी जर राजीनामा दिला तर पेपर फुटीचे रॅकेट जनतेला कळेल अशी भीती सरकारच्या मनात होती. असा दोषहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

इथेनॉलच्या संदर्भात नितीन गडकरींचा राजीनामा व्हायला हवा होता. नरेंद्र मोदी हे या देशाचा भूतकाळ आहे आणि तरुणाई या देशाचे भविष्य आहे. हे या घटनेवरून अधोरेखित झालं आहे. तरुणाई आणि विरोधक या कॉम्बिनेशनने हा राजीनामा झाला आणि हे यश मिळालं. हे यश तरुणाईमुळेच मिळालं. मात्र सीजेपी व अभिजीत दिपके यांचे नाव राहुल गांधी व हर्षवर्धन सपकाळ दोघेही घ्यायचं टाळत असल्याचे यावेळी दिसून आले. दैवतीकरण करणे हा भाजपचा अजेंडा आहे. सामुदायिक नेतृत्वाने आपण पुढे गेलो पाहिजे. विद्यार्थ्यांना आता यश मिळालं. मात्र राहुल गांधींनी या संदर्भातील मोहीम बऱ्याच पूर्वीपासून सुरू केली होती असेही प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Harshvardhan Sapkal : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी ची ‘भीमगर्जना’ राहुल गांधींनी सर्वात आधी केली

नुकत्याच झालेल्या आंदोलनात देशाच्या पंतप्रधानाबद्दल जे जे बोलले गेलं ते आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानांबद्दल बोलल्या गेलं नाही. हा युवकांचा उद्रेक वाखाणण्याजोगा आहे. आगामी काळात एक घटना अशी होईल की देशाचं राजकारण पूर्णतः बदलून जाईल. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे विरोधी पक्षांना नवसंजीवनी मिळाली, असे म्हणता येणार नाही. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी ची ‘भीमगर्जना’ राहुल गांधींनी सर्वात आधी केली होती. देशातील आंदोलन व सध्या परिस्थितीमुळे जागतिक स्तरावरील माध्यमांनी दखल घेतली व त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन झालेली आहे. असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.