‘विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार’

मंगलप्रभात लोढा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच देशाच्या युवा पिढीचा विचार केला असून, भविष्यातही त्यांच्या शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार आणि सक्षमीकरणासाठी ते तितक्याच बांधिलकीने कार्य करत राहतील. आज भारताकडे जगातील सर्वाधिक युवा शक्ती हीच मोठी ताकद आहे, आणि देशविरोधी शक्तींनाही याची जाणीव आहे. त्यामुळेच खोटे आरोप आणि फेक नॅरेटिव्हच्या माध्यमातून युवकांची दिशाभूल केली जात आहे; मात्र हा अपप्रचार आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी  म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विद्यार्थी व युवकांसाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘धन्यवाद मोदीजी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या योजना फलकांच्या (बॅनर्स) माध्यमातून थेट नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. उद्या 27 जुलै रोजी मुंबई हा कार्यक्रम होणार आहे.

उपक्रमांची सविस्तर माहिती नागरिकांना दिली जाईल

या कार्यक्रमादरम्यान फलकांच्या (Exhibition Panels) माध्यमातून केंद्र सरकारच्या खालील महत्त्वपूर्ण उपक्रमांची सविस्तर माहिती नागरिकांना दिली जाईल. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020), मल्टिपल एन्ट्री आणि एक्झिट प्रणाली, PM SHRI शाळा, PM e-VIDYA, DIKSHA पोर्टल, तसेच प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना आणि प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना,  IIT, IIM आणि AIIMS या संस्थांचा विस्तार, स्किल इंडिया अभियान, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY), आणि PM-SETU आणि संकटकाळात भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशी आणणारी ‘ऑपरेशन गंगा’ मोहीमची माहिती दिली जाणार आहे.

मंगलप्रभात लोढा म्हणाले, “विरोधकांकडे विकासाची कोणतीही ठोस दृष्टी नाही, त्यामुळे ते आंदोलने, अपप्रचार आणि फेक नॅरेटिव्हचा आधार घेऊन युवकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र, सत्य जनतेसमोर आणणे ही आमची जबाबदारी आहे. ‘धन्यवाद मोदीजी’ हा केवळ एक कार्यक्रम नसून देशाच्या युवा शक्तीने अनुभवलेल्या सकारात्मक परिवर्तनाबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता आहे.”

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

या विशेष कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, भारतीय जनता युवा मोर्चा, महिला मोर्चाचे कार्यकर्ते, विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, तरुण आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. केंद्र सरकारच्या युवककेंद्रित धोरणांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.