धर्मेंद्र प्रधान स्वतःच दोनदा राजीनामा देण्यासाठी गेले? सरकारने मंजूर केला नाही, इनसाईड स्टोरी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा : केंद्रीय शिक्षण मंत्री पदावरून शनिवारी (२५ जुलै २०२६) राजीनामा देणारे धर्मेंद्र प्रधान यांनी कथितपणे NEET पेपर लीक वाद आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान (Dharmendra Pradhan Resign) दोनदा आपले पद सोडण्याची ऑफर (Dharmendra Pradhan Resign) दिली होती. मात्र, सरकारी नेतृत्वाने दोन्ही वेळेस त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही आणि त्यांना शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवर काम सुरू ठेवण्यास सांगितले. ही माहिती सरकारी सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.(Dharmendra Pradhan Resign)
२० जुलै रोजी वरिष्ठ मंत्र्यांची एक उच्चस्तरीय बैठक झाली होती. असा दावा केला जात आहे की, या बैठकीत धर्मेंद्र प्रधान यांनी पुन्हा एकदा राजीनामा देण्याबाबत आपलं मत व्यक्त केलं होतं. मात्र सरकारने त्यांचा प्रस्ताव स्वीकारला नाही. फक्त राजीनामा देणे हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही, असे नेतृत्वाचे मानणे होते. कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा देणे हा सर्वात सोपा मार्ग असू शकतो, परंतु खरी गरज व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याची आणि सुधारणा लागू करण्याची आहे, असा सरकारचा विचार होता. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.(Dharmendra Pradhan Resign)
Dharmendra Pradhan Resign: ‘कॉकरोच जनता पार्टी’सोबत (CJP) चर्चा
पण, नंतर परिस्थिती बदलली. सूत्रांनुसार, कॉकरोच जनता पार्टी (CJP) सोबत दुसऱ्या फेरीच्या चर्चेनंतर सरकारने परिस्थितीचे पुन्हा मूल्यांकन केले. असे सांगण्यात आले की, या संघटनेने २० जुलैच्या ‘चलो संसद’ मार्चप्रमाणेच आणखी एका मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला होता. २० जुलैच्या निदर्शनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत अनेक विद्यार्थी जखमी झाले होते, ज्यामुळे सरकार आधीच चिंतित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा एजन्सींनीही सरकारला अहवाल दिला होता. यामध्ये काही देशविरोधी घटक या आंदोलनाचा आणि अशांततेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती.
Dharmendra Pradhan Resign: सोशल मीडिया खात्यांची ओळख पटवली
अहवालानुसार, डिजिटल देखरेखीदरम्यान ४०० हून अधिक सोशल मीडिया खात्यांची ओळख पटवण्यात आली. यामध्ये सुमारे १०० इंस्टाग्राम खाती अशी असल्याचे सांगितले गेले, जी कथितपणे पाकिस्तानमधून चालवली जात होती आणि भारतात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला खतपाणी घालण्यासाठी किंवा त्यांच्याशी संबंधित कंटेंट शेअर करण्यासाठी वापरली जात होती. सुरुवातीच्या तपासात हे देखील समोर आले की, यातील काही खाती आधीही विविध संवेदनशील मुद्द्यांदरम्यान सक्रिय होती. सूत्रांनुसार, दिल्ली पोलिसांच्या ‘फेशिअल रिकग्निशन सिस्टीम’ने (Facial Recognition System) २० जुलै ते २४ जुलै दरम्यान जंतर-मंतर आणि त्याच्या आसपास उपस्थित असलेल्या सुमारे ४०० अशा लोकांची ओळख पटवली होती, ज्यांची नोंद आधीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमीत आहे. यातील काही लोक २० जुलै रोजी झालेल्या तोडफोडीच्या घटनांशीही जोडलेले असल्याचा संशय होता.
Dharmendra Pradhan Resign: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा स्वीकारला
या सर्व घडामोडी आणि सुरक्षा यंत्रणांच्या अहवालानंतर सरकारने परिस्थितीचे पुनर्मूल्यांकन केले. सूत्रांच्या माहितीनुसार, सार्वजनिक सुव्यवस्था राखणे आणि तणाव कमी करणे गरजेचे आहे, या निष्कर्षाप्रत सरकार पोहोचले. याच दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी पुन्हा एकदा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. नंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. याच्या काही तासांनंतरच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला.
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Comments are closed.