देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा!

निवडणुकीच्या वयावर रेवंत रेड्डी: लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्याचे किमान वय 25 वरून 21 वर्षे करण्याचा प्रस्ताव मंजूर केला जाईल. यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, असे सुतोवाच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केले आहेत. नीट पेपरफुटी निषेधार्थ हैदराबादमध्ये आयोजित केलेल्या कँडललाइट रॅलीत त्यांनी हे विधान केले. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा आणि विधान परिषदेचे विशेष अधिवेशन बोलावले जाईल. रेवंत रेड्डी यांच्या प्रस्तावाला मोदी सरकार मान्यता देणार का? याची उत्सुकता असेल.

राजकारणात तरुणांना सामील करून घेण्याची तयारी

रेवंत रेड्डी म्हणाले की, देशाच्या लोकसंख्येत तरुणांची (जनरेशन जी) संख्या 30 टक्के आहे, परंतु लोकसभेत त्यांचे प्रतिनिधित्व 1 टक्क्यापेक्षा कमी आहे. ते म्हणाले की, जर 21 वर्षांवरील तरुण मंत्री झाले, तर देशाचे भविष्य बदलेल. यासाठी संविधानात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. उदाहरणे देताना मुख्यमंत्री म्हणाले की, जर्मनी आणि ब्रिटनमध्ये 18 वर्षांचे तरुण पंतप्रधान आणि राष्ट्रपती होऊ शकतात. सिंगापूरमध्ये 21 वर्षांचा तरुण पंतप्रधान होऊ शकतो. ते म्हणाले की, भारतात 21 वर्षांचे तरुण आयएएस, आयपीएस अधिकारी, महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष बनू शकतात.

राजीव गांधी आणि नरसिंह राव यांच्या निर्णयांचा संदर्भ

रेवंत रेड्डी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मतदानाचे वय 21 वरून 18 पर्यंत कमी करण्याच्या निर्णयाची आठवण करून दिली. त्यांनी 21 वर्षांच्या तरुणांना महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा हक्कही दिला होता. मुख्यमंत्री म्हणाले की, जर राहुल गांधी पंतप्रधान झाले, तर ते एका तरुण नेत्याला केंद्रीय शिक्षण मंत्री बनवतील. ते म्हणाले की, तरुण लोक संसदेत पोहोचू शकतील आणि आपला आवाज उठवू शकतील, हे सुनिश्चित करण्यासाठी ते इंडिया अलायन्सच्या नेत्यांशी बोलतील.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.