दिल्लीत RAF ने विद्यार्थ्यांवर बंदी असलेल्या त्या शस्त्राचा वापर केला, महत्त्वाची माहिती समोर,

CJP प्रोटेस्ट पेलेट गन: राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर (Jantar Mantar) येथे झालेल्या CJP च्या संसद मोर्चानंतर (Parliament March) आता आणखी एक मोठा वाद समोर आला आहे. मोर्चादरम्यान रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स (Rapid Action Force) च्या जवानांनी आंदोलनकर्त्यांवर पॅलेट गन (Pellet Gun) वापरल्याचा दावा समोर आला असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 20 जुलै रोजी झालेल्या संसद मोर्चादरम्यान RAF च्या जवानांनी पेलेट गनमधून गोळीबार केला. या घटनेत तीन आंदोलनकर्ते जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर सुरक्षा दलांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) महासंचालक जी. पी. सिंह (G. P. Singh) यांनी या घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली आहे. गोळीबार कोणत्या परिस्थितीत करण्यात आला, जवानांनी मानक कार्यपद्धतीचे पालन केले होते का, याची सखोल चौकशी केली जात आहे. पुढील एक-दोन दिवसांत CRPF कडून या संपूर्ण प्रकरणावर अधिकृत भूमिका जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल

दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहून या प्रकरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात सरकारला विचारले आहे की, आंदोलन करणाऱ्या युवकांवर पॅलेट गन (Pellet Gun) आणि इतर बळाचा वापर करण्यास सरकारने परवानगी दिली होती का? तसेच, कोणत्याही लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे नमूद करत आंदोलनकर्त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि त्यांच्या मागण्यांवर संवादातून तोडगा काढणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

CJP Protest: लाठीचार्ज आणि अश्रुधूरावरूनही वाद

पेपरफुटी (Paper Leak) प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन केले होते. त्यानंतर CJP ने 20 जुलै रोजी संसद मोर्चाची घोषणा केली होती. मोर्चादरम्यान गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा दलांनी लाठीचार्ज (Lathi Charge) केला आणि अश्रुधूराचे गोळे डागले होते. या घटनेवरून विरोधकांनी संसदेतही सरकारला धारेवर धरले होते. आता पॅलेट गन वापरल्याच्या दाव्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले असून, चौकशी अहवालानंतर नेमके काय घडले? याबाबत अधिकृत चित्र स्पष्ट होणार आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती

Comments are closed.