रवींद्र जडेजा, सारांश जैन IN, वॉशिंग्टन OUT; श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा
टीम इंडियाचा संघ विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज (28 जुलै) श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी (Ind vs SL) भारतीय संघाची (Team India Squad vs Sri Lanka Test Series) घोषणा केली आहे. शुभमन गिलकडे (Shubhman Gill) संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून केएल राहुलची (KL Rahul) उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे तब्बल आठ महिन्यांनंतर अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचे (Ravindra Jadeja) कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा अंतिम सहभाग त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. (India vs Srilanka Test Series Schedule)
रवींद्र जडेजाचे आठ महिन्यांनंतर पुनरागमन- (Ravindra Jadeja Ind vs SL Test Series 2026)
श्रीलंका मालिकेसाठी संघ निवडण्यापूर्वी रवींद्र जडेजाला संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जडेजाने 26 नोव्हेंबर 2025 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याला वनडे संघातूनही वगळण्यात आले होते. मात्र आता तो पुन्हा एकदा भारतीय संघात परतला आहे. भारताचा पहिला कसोटी सामना 15 ऑगस्ट रोजी होणार असून त्या दिवशी जडेजा तब्बल 262 दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल.
जसप्रीत बुमराह संबंधी प्रमुख अपडेट्स – (जसप्रीत बुमराह इंडस्ट्रीज विरुद्ध एसएल टेस्ट सिरीज 2026)
बीसीसीआयने जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शन यांचा संघात समावेश केला असला, तरी दोघांचा अंतिम सहभाग त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यानंतर बुमराहच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मालिकेतील निर्णायक सामना गमवावा लागला होता. बुमराह आणि सुदर्शन यांना सेंटर ऑफ एक्सलन्सकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच त्यांना खेळण्याची परवानगी मिळेल. तसेच अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर निवडीसाठी उपलब्ध नसल्याची माहितीही बीसीसीआयने दिली.
सारांश जैनचा पहिल्यांदाच कसोटी संघात समावेश- (Who Is Saransh Jain Ind vs SL)
सारांश जैनचा पहिल्यांदाच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. 33 वर्षीय सारांश हा डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचे फिरकी गोलंदाज आहेत. सारांश जैन देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करतो. सारांश जैनने 54 प्रथम श्रेणी सामन्यांत 188 विकेट्स घेतल्या आहेत आणि 2223 धावा केल्या आहेत.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ- (Team India Squad vs Sri Lanka Test Series)
शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन.
🚨 बातम्या 🚨#TeamIndiaश्रीलंकेविरुद्धच्या 2⃣ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली
टीप: वॉशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटीसाठी निवडीसाठी उपलब्ध नव्हता.
अधिक तपशील ▶️ https://t.co/Vk0Xd8Axmq #SLvIND pic.twitter.com/NuCcKBohMj
— BCCI (@BCCI) 28 जुलै 2026
भारत आणि श्रीलंकेत दोन सामन्यांची कसोटी मालिका- (Ind vs SL Test Series 2026)
भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना 15 ऑगस्ट 2026 ते 19 ऑगस्ट 2026 रोजी तर दुसरा कसोटी सामना 23 ऑगस्ट 2026 ते 27 ऑगस्ट 2026 ला खेळवण्यात येणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 च्या पार्श्वभूमीवर भारतासाठी हा महत्वाचा दौरा असेल.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, Video:
ही बातमीही वाचा:
Comments are closed.