श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात 33 वर्षीय खेळाडूची अचानक एन्ट्री; कोण
टीम इंडियाचा संघ विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका: भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका (Ind vs SL) खेळवण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने आज टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना 15 ऑगस्ट 2026 ते 19 ऑगस्ट 2026 रोजी तर दुसरा कसोटी सामना 23 ऑगस्ट 2026 ते 27 ऑगस्ट 2026 ला खेळवण्यात येणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 च्या पार्श्वभूमीवर भारतासाठी हा महत्वाचा दौरा असेल.
शुभमन गिलकडे (Shubhman Gill) संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून केएल राहुलची (KL Rahul) उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे तब्बल आठ महिन्यांनंतर अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचे (Ravindra Jadeja) कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा अंतिम सहभाग त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, मानव सुथार यांचाही श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे वॉशिंग्टन सुंदरच्या जागी सारांश जैन (Saransh Jain) याला संधी देण्यात आली आहे. सारांश जैनच्या अचानक टीम इंडियामधील एन्ट्रीने विविध चर्चांना उधाण आले आहे. (Team India Squad vs Sri Lanka Test Series)
सारांश जैनची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील प्रभावी कारकीर्द- (Who Is Saransh Jain Ind vs SL)
33 वर्षीय डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा ऑफ-स्पिन गोलंदाज असलेल्या सारांश जैनने एप्रिल 2014 मध्ये मध्य प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने 54 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 27.30 च्या सरासरीने 188 विकेट्स घेतले आहेत. फलंदाज म्हणून त्याने 31.75 च्या सरासरीने 2223 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतके आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. ‘लिस्ट-ए’ (List-A) क्रिकेटमध्ये सारांशने 47 सामन्यांत 553 धावा केल्या आणि 38 विकेट्स घेतल्या आहेत, तर 20 टी-20 सामन्यांत त्याने 18 बळी आणि 37 धावांची नोंद केली आहे. याच अष्टपैलू कामगिरीमुळे तो सातत्याने निवडकर्त्यांच्या नजरेत राहिला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ- (Team India Squad vs Sri Lanka Test Series)
शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन.
🚨 बातम्या 🚨#TeamIndiaश्रीलंकेविरुद्धच्या 2⃣ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली
टीप: वॉशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटीसाठी निवडीसाठी उपलब्ध नव्हता.
अधिक तपशील ▶️ https://t.co/Vk0Xd8Axmq #SLvIND pic.twitter.com/NuCcKBohMj
— BCCI (@BCCI) 28 जुलै 2026
भारत आणि श्रीलंकेच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक- (Ind vs SL Test Series Schedule)
- पहिला कसोटी सामना- 15 ते 19 ऑगस्ट, गॉल, सकाळी 10 वाजता.
- दुसरा कसोटी सामना- 23 ते 27 ऑगस्ट, कोलंबो, सकाळी 10 वाजता.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, Video:
संबंधित बातमी:
Comments are closed.