सनीच्या ‘बटवारा 1947’ सोबत टक्कर टाळण्यासाठी, ‘आवारपन 2 ’ पुढे ढकलणार? अफवांवर निर्मात्यांनी सोडले मौन
इम्रान हाश्मीने स्वतः सोशल मीडियावरून ‘आवारपन 2 ’चा ट्रेलर 6 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर विशेष भट्ट आणि इम्रान हाश्मी यांनी इंस्टाग्राम लाइव्हदरम्यान चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत सुरू असलेल्या अफवांवर भाष्य केले. या लाइव्हमध्ये दोघांनीही चित्रपट पुढे ढकलला जाणार असल्याच्या बातम्या स्पष्टपणे फेटाळून लावल्या असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.
विशेष भट्ट यांनी यावेळी सांगितले की, ‘विशेष फिल्म्स’ने आपले चित्रपट कधीही विनाकारण पुढे ढकललेले नाहीत. ‘आवारपन 2’ मध्ये मोठ्या प्रमाणात ॲक्शन सीक्वेन्स आहेत. त्यामुळे या सीन्सच्या चित्रीकरणासाठी अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागला. शिवाय चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान इम्रान हाश्मी जखमी झाला होता. त्यामुळे त्याला काही काळ विश्रांती घ्यावी लागली. परिणामी चित्रपटाचे काम लांबले आणि प्रदर्शनाची तारीख ऑगस्टपर्यंत पुढे गेली.
मात्र, आता प्रदर्शनाची तारीख पुन्हा पुढे ढकलण्याचा कोणताही निर्णय नसल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे सनी देओलच्या चित्रपटाशी होणारी संभाव्य टक्कर टाळण्यासाठी ‘आवारपन 2’ मागे हटणार असल्याच्या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे.
‘आवारपन 2’चा टीझर काही आठवड्यांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. टीझरला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. सध्या सर्वांचे लक्ष 6 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ट्रेलरकडे लागले आहे. ट्रेलरमधून चित्रपटाची कथा आणि इम्रानच्या व्यक्तिरेखेचा नेमका कोणता नवा पैलू समोर येतो, याची उत्सुकता वाढली आहे
Comments are closed.