रत्नागिरीचे माजी उपनगराध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

रत्नागिरीचे माजी उपनगराध्यक्ष आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 55 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि जावई असा परिवार आहे.

राजेश सावंत हे कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान प्रवास करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. राजेश सावंत हे 2016 साली रत्नागिरी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष होते. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षात त्यांनी काम केले होते. माजी आमदार कै.अप्पा साळवी यांचे ते जावई होते. रत्नागिरीतील उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ते परिचित होते. संग्राम क्रिकेट क्लबचे ते प्रतिनिधित्व करत असतं.

Comments are closed.