Food Safety : फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न किती वेळ सुरक्षित राहतं? ‘या’ चुका टाळा
शिजवलेलं अन्न किती वेळ ठेवावं?
सामान्यतः शिजवलेलं उरलेलं अन्न 2 तासांच्या आत फ्रिजमध्ये ठेवणं योग्य मानलं जातं. वातावरण खूप उष्ण असल्यास हा कालावधी आणखी कमी असू शकतो. अन्न बराच वेळ बाहेर ठेवल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवणं सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही. अन्न दिसायला किंवा वासाला ठीक वाटलं तरी त्यात हानिकारक जंतू वाढलेले असू शकतात.
फ्रिजमध्ये अन्न ठेवताना ‘या’ चुका टाळा
गरम अन्न बाहेर ठेवू नका
अन्न पूर्णपणे थंड होईपर्यंत अनेक तास बाहेर ठेवण्यापेक्षा ते लहान, उथळ डब्यांमध्ये भरून लवकर फ्रिजमध्ये ठेवणं चांगलं.
उघडं अन्न
अन्न नेहमी झाकण असलेल्या स्वच्छ डब्यात ठेवा. यामुळे अन्नाचा वास पसरत नाही आणि इतर पदार्थांमधून होणारा संसर्ग टाळण्यास मदत होते.
फ्रिज भरू नका
फ्रिजमध्ये हवा व्यवस्थित फिरण्यासाठी थोडी जागा असणं गरजेचं आहे. फ्रिज अतिशय भरलेला असल्यास योग्य तापमान राखण्यात अडचण येऊ शकते.
वेगवेगळे अन्न साठवा
नवीन बनवलेलं अन्न जुन्या उरलेल्या अन्नात मिसळण्याऐवजी वेगळ्या डब्यात ठेवा. डब्यावर तारीख लिहिल्यास कोणतं अन्न आधी वापरायचं हे लक्षात राहतं.
Comments are closed.