7 killed in horrific bus accident in Himachal

हिमाचल प्रदेशातील चंबा जिह्यातील चुरा उपविभागांतर्गत बैरागढ-चंबा महामार्गावर शनिवारी सकाळी एक भीषण रस्ते अपघात घडला. बैरागढहून चंबाकडे जाणारी शर्मा ट्रॅव्हलर्सची खासगी बस, देविकोठीजवळच्या चालुज वळणावर अचानक नियंत्रणाबाहेर गेल्याने खाली दुसऱ्या रस्त्यावर कोसळली. या भीषण रस्ते अपघातात चालक आणि वाहकासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 11 जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शर्मा ट्रॅव्हलर्सची बस शनिवारी सकाळी सुमारे 6:30 वाजता बैरागढहून चंबासाठी निघाली होती. बसने केवळ तीन किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर चालुज वळणाजवळ चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि बस खाली कोसळली. अपघातावेळी बसमध्ये अंदाजे 15 ते 16 प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव व मदतकार्य सुरू केले. गावकऱ्यांनी मोठ्या प्रयत्नांती नुकसान झालेल्या बसमधून जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी त्यांना तात्काळ तीसा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

Comments are closed.