पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनस्थळांची सुरक्षा कडक करण्यात आली आहे

संसदीय समितीकडून शिफारसी : जम्मू-काश्मीरमध्ये होणार अंमलबजावणी

संसदेच्या एका समितीने जम्मू-काश्मीरमधील सर्व प्रमुख पर्यटनस्थळांसाठी ‘एकीकृत सुरक्षा अन् देखरेख व्यवस्था’ निर्माण करण्याची शिफारस केली आहे. यात केंद्रीय देखरेख सुविधाही सामील आहे. केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरच्या प्रशासन, सामाजिक-आर्थिक विकास, सीमा सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षाविषयक समितीने स्वत:चा अहवाल सादर केला आहे. यात केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये सीमा सुरक्षा व्यवस्थापन आणि तयारींनाही सामील करण्यात आले आहे.

न्यूजपेपर सोसायटी, श्रीनगर

वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणांदरम्यान मापक संचान प्रक्रिया (एसओपी) निश्चित करण्यात याव्यात. पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी त्यांची समीक्षा देखील केली जावी. यामुळे सुरक्षेशी निगडित कुठल्याही घटनेवर सर्व यंत्रणांना मिळून वेळेत अन् योग्यप्रकारे कारवाई करता येणार असल्याचे समितीने म्हटले आहे. मागील वर्षी 22 एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या शिफारसी करण्यात आल्या आहेत. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची क्रूरपणे हत्या केली होती.

पर्यटनस्थळी देखरेख

सर्व प्रमुख पर्यटन स्थळांसाठी एकीकृत सुरक्षा अन् देखरेख व्यवस्था विकसित करण्यात यावी. यात पूर्ण क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे व्यापक कव्हरेज, केंद्रीय देखरेख सुविधा, नियमित स्वरुपात सुरक्षा त्रुटींचे आकलन आणि वेळावेळी सुरक्षा ऑडिट सामील असावे अशी शिफारस समितीने केली आहे.

यंत्रणांदरम्यान ताळमेळ

वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणांदरम्यान स्पष्ट एसओपी निश्चित करण्यात याव्यात आणि प्रत्येक प्रमुख पर्यटन हंगामापूर्वी त्याची समीक्षा करण्यात यावी अशी शिफारस संसदीय समितीने केली आहे. समितीने 11-15 मे 2026 पर्यंत जम्मू, श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग अन् कारगिलचा दौरा करत अध्ययन केले होते. समितीने गुलमर्गच्या पर्यटन स्थळावर सुरक्षा व्यवस्थेचे प्रत्यक्ष तेथे जात आकलन पेले होते.  सोनमर्गमध्ये कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवरून जम्मू-काश्मीर पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. याचबरोबर सैन्याच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत कारगिलमध्ये सीमा सुरक्षेशी निगडित व्यवस्था आणि तेथील कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्याच्या तयारींचा आढावा घेतला होता.

पर्यटकांची संख्या वाढती

समितीने जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत असल्याचा उल्लेख केला आणि या स्थितीत पर्यटनस्थळांच्या सुरक्षा व्यवस्थेचे खास महत्त्व असल्याचे म्हटले आहे. याचा थेट प्रभाव लोकांदरम्यान सुरक्षेची भावना, पर्यटकांच्या अनुभवांची गुणवत्ता आणि पर्यटनक्षेत्राच्या सातत्याने वाढणाऱ्या हालचालींवर पडत असल्याचे समितीने म्हटले आहे.

लडाखमध्ये तंत्रज्ञानांवर भर

समितीने लडाखमध्ये आधुनिक शस्त्रास्त्र प्रणाली, मानवरहित हवाई प्रणाली, ड्रोनविरोधी तंत्रज्ञान, आधुनिक टेहळणी उपकरणे, विशेष प्रकारच्या वाहतूक सुविधा आणि लडाखमध्ये वापरता येणाऱ्या वाहनांना सुरक्षा व्यवस्थेत सामील करण्यात आल्याप्रकरणी आनंद व्यक्त केला. समितीने एकीकृत गुप्तचर माहिती, देखरेख अन् टेहळणी क्षमता, ड्रोनविरोधी प्रणाली, सुरक्षित संचार नेटवर्क आणि देशात विकसित उंचीवरील भागांसाठीच्या आधुनिक तंत्रज्ञानांमध्ये सातत्याने गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. संरक्षण मंत्रालयाने सर्व रणनीतिक स्वरुपात महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये वेळेत खरेदी, तैनात आणि तंत्रज्ञानात वेळावेळी सुधार सुनिश्चित करावा असे अहवालात म्हटले गेले आहे.

अधिक गर्दीयुक्त भागांमधील व्यवस्था

मोठ्या संख्येत पर्यटक पोहोचणाऱ्या ठिकाणी विशेष आपत्कालीन प्रतिक्रिया पथक, पुरेशा सुविधांनी युक्त रुग्णवाहिका, गंभीर ईजांवरील उपचारांची सुविधा आणि स्पष्टपणे ओळख पटविण्यात आलेले मार्ग उपलब्ध करविण्यात याव्यात असे अहवालात म्हटले गेले आहे. समितीने सुरक्षा दलांची समग्र सुरक्षा व्यवस्था आणि तयारींचे कौतुक केले आहे. आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि सुरक्षेशी निगडित निर्देश हॉटेल्स, परिवहन केंद्र आणि पर्यठन सुविधांवर प्रामुख्याने दर्शविण्यात यावेत, हे संपर्क क्रमांक अनेक भाषांमध्ये उपलब्ध करविण्यात यावेत असे समितीने म्हटले आहे.

Comments are closed.