रशियाच्या 1,200 किलोमीटर आत युक्रेनने केला वार; तेल प्रकल्पांवर हल्ले, 12 जणांचा मृत्यू
एकीकडे इराण युद्ध थांबण्याची चिन्हे असताना युक्रेन युद्ध पुन्हा भडकले आहे. युक्रेनने थेट सुमारे 1,200 किलोमीटर आत रशियावर मोठा वार केला आहे. रशियाच्या निजनेकाम्स्क या शहरात अतिशय घातक ड्रोन हल्ला केला. त्यात 12 जणांचा मृत्यू तर, 39 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे रशियाला दुहेरी फटका बसला आहे.
निजनेकाम्स्क हे शहर रशियाचे अतिशय महत्त्वाचे तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल केंद्र आहे. युक्रेनने त्यावरच वार केला. युक्रेनने लांब पल्ल्याच्या ड्रोनचा वापर या हल्ल्यात केला. तेल प्रकल्पांचे त्यात मोठे नुकसान झाले आहे.
Comments are closed.