26/11च्या हल्ल्याशी संबंधित ‘लश्कर’च्या टॉप कमांडरचा पाकिस्तानात गूढ मृत्यू
मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्यात सहभागी असलेल्या ‘लश्कर-ए-तोयबा’च्या एका बड्या कमांडरचा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. कारी सईद अब्दुल अझीझ असे या दहशतवाद्याचे नाव आहे. इस्लामाबादमधील मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ तो अचानक कोसळला आणि त्याचा तेथेच मृत्यू झाला. अब्दुल अझीझ हा कुबा मशिदीत दुपारची नमाज अदा करण्यासाठी गेला होता.
प्राप्त माहितीनुसार, त्याने मशिदीत जाण्यापूर्वी एका रेस्टॉरंटमध्ये जेवण केले होते. जेवण करून मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच तो अचानक कोसळला. मशिदीमध्ये उपस्थित लोकांनी त्याला सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्याला रुग्णालयातदेखील दाखल करण्यात आले; मात्र त्याचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. अझीझच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जेवणातून त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
Comments are closed.