ट्रेंड – संस्कारी चिमुरडा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लहान मुले फारच निरागस असतात. कधी कधी ती निरागसपणे अशी काही कृती करतात की सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. अशाच एका चिमुरड्याची निरागसता एका व्हिडिओमध्ये बघायला मिळाली आहे. हा मुलगा एका मॉलमध्ये आहे. एका दुकानासमोर 3 पुतळे ठेवले आहेत. हा मुलगा त्या पुतळ्यांच्या पायांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेताना दिसतोय. हे दृश्य पाहून कोणालाही हसू येईल. पण दुसऱ्याच क्षणी या मुलावर त्याच्या आईवडील आणि घरच्यांनी किती चांगले संस्कार केले आहेत असा विचार आपल्या मनात डोकावल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही या चिमुरड्याने कौतुक कराल. लहान मुलांना जे शिकवले जाते ते त्याचे अनुकरण करत असतात. हा व्हिडीओ प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून जातो. सदर व्हिडीओ @av_twinss या इंस्टावरील असून त्यात कमेंट केली आहे की, पुतळे जिवंत होऊन आशीर्वाद देतील.

Comments are closed.