सुनील तटकरे यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात? राष्ट्रवादीकडूनच निवडणूक आयोगाकडे तक्रार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची निवड पूर्णपणे बेकायदेशीर असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. पक्षातूनच करण्यात आलेल्या या तक्रारीमुळे तटकरे यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आले आहे.

सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष पदावर निवड करताना पक्षाच्या घटनात्मक तरतुदीनुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. प्रदेशाध्यक्ष पदाचा कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदरच त्यांनी स्वतःची या पदावर निवड करून घेतली. त्यामुळे त्यांची ही निवड रद्द करण्यात यावी, अशी मागणी अजित पवार गटाचे परतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

तटकरे यांच्या नियुक्तीचा ३ वर्षांचा सामान्य कार्यकाळ जुलै २०२६ मध्येच संपुष्टात आला आहे. त्यानंतर कोणतीही संघटनात्मक निवडणूक न घेता तटकरे अद्याप पदावर कसे कार्यरत आहेत, असा सवाल गोरे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, रुपाली ठोंबरे यांनीही तटकरे यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडावे अशी मागणी केली आहे.

तक्रारीत काय म्हटले आहे?
कोणत्याही पक्षाचा प्रदेशाध्यक्ष त्या त्या पक्षाच्या घटनेनुसार निवडला जातो. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या घटनेनुसार तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष यांची निवड प्रक्रिया आधी पार पाडली जाते. त्यानंतर या सर्वांच्या समन्वय सभेत प्रदेशाध्यक्ष निवडला जातो. ही घटनात्मक प्रक्रिया पूर्ण न करताच स्वतःचा कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदरच घाईगडबडीत तटकरे यांनी निवड करवून घेतली आहे.

Comments are closed.