मॅकडॉवेल रमवरील बंदी तूर्त मागे घेता येणार नाही! हायकोर्टात केंद्र सरकारची माहिती, उत्तर सादर करण्याचे आदेश
मॅकडॉवेल रमवरील बंदी तूर्त तरी मागे घेता येणार नाही. आता उपलब्ध असलेला साठा विकायचा असल्यास त्यावर फ्लेवरची नोंद करावी लागेल, अशी माहिती केंद्र सरकारने उच्च न्यायालयात दिली.
हंगामी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. ऑडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी ही माहिती खंडपीठाला दिली. मॅकडॉल रमच्या याचिकेचे उत्तर सादर केले जाईल. तोपर्यंत बंदी मागे घेण्यावर काहीही भाष्य करता येणार नाही, असे ऑडिशनल सॉलिसिटर जनरल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले.
काय आहे प्रकरण…
पुणे येथे या रमचे उत्पादन होते. अन्न सुरक्षा दर्जा प्राधिकरणाने (एफएसएसआयए) येथे धाड टाकत रमच्या उत्पदान व विक्रीवर बंदी घातली. रमच्या बॉटलवर फ्लेवरची व वयोमर्यादेची नोंद नाही, असे कारण एफएसएसआयने ही कारवाई करताना दिले.
नियमाचे उल्लंघन केले नाही
नियमानुसार आम्ही रमचे उत्पादन करतो. फ्लेवरची नोंद असावी असा कोणताही नियम नाही. आमच्या रममध्ये कोणताही दोष नाही. आमचे म्हणणे ऐकून न घेताच ही कारवाई करण्यात आली. तसेच आमची रम मानवी शरीरासाठी हानिकारक आहे, असा निष्कर्ष कारवाईच्या तपशिलात नोंदवण्यात आलेला नाही. एफएसएसआयएच्या अधिकाऱयाने ही कारवाई केली आहे. अधिकाऱयाला ही कारवाई करण्याचा अधिकारच नाही. असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
Comments are closed.