स्वातंत्र्यदिनी खास दिसण्यासाठी ट्राय करा या गोष्टी

15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्यदिन संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या राष्ट्रीय सणानिमित्त शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व विविध  कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी संपूर्ण भारत सफेद रंगात रंगून जातो. बरेच लोक या दिवशी पांढऱ्या, हिरव्या, केशरी, निळ्या रंगाचे कपडे घालतात. 15 ऑगस्टला अनेक ऑफिसमध्ये ध्वजवंदनचा कार्यक्रम केला जातो. या कार्यक्रमाला सुंदर दिसण्यासाठी कसे हटके दिसता येईल याविषयी खास टिप्स जाणून घेऊयात.

तिरंगी रिबन

जर तुमच्याकडे तिरंगी रंगाचा ड्रेस नसेल, तर तुम्ही केशरी, पांढऱ्या किंवा हिरव्या रंगाचा कोणताही प्लेन आउटफिट घालू शकता. या ड्रेसवर तिरंगी रिबनचा वापर करता येईल. या रिबनचे छोटेसे फूल बनवून कुर्त्यावर लावा किंवा स्टाईल म्हणून ती मनगटावर बांधता येईल.

ऑक्सिडाइज्ड दागिने

एखाद्या पांढऱ्याशुभ्र कुर्त्यावर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी नक्की ट्राय करा. आवडीनुसार मोठे झुमके,  नेकपीस, ब्रेसलेट किंवा बांगड्या घालू शकता.

हेअरस्टाईल

जर तुम्ही साडी नेसणार असाल तर आंबाडा बांधून त्यात मोगऱ्याचा गजरा माळा. जर तुम्ही पंजाबी ड्रेस किंवा वेस्टर्न कपडे घातले असतील, तर केस मोकळे सोडणे अधिक शोभून दिसेल.

तिरंगी बांगड्या

हातात केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांच्या बांगड्यांचा सेट नक्की घाला.

तिरंगी बेल्ट

जर तुम्हाला साडी नेसायला आवडत असेल, तर त्यावर बेल्ट लावून तुम्ही एक मॉडर्न टच देऊ शकता. स्वातंत्र्यदिनाच्या थीमशी मिळताजुळता तिरंगी रंगाचा बेल्ट वापरल्यास तुम्ही इतंरापेक्षा अधिक वेगळे नक्कीच दिसू शकता.

हेही वाचा – सेलिब्रिटींसारखी वेगळी ओळख हवीये? मग असा तयार करा स्वतःचा सिग्नेचर लूक

Comments are closed.