पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री शहा, राहुल अन् सोनिया गांधींची सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनला हजेरी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती आणि उद्योजक अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांचा विवाह नुकताच पार पाडला होता. त्यांच्या विवाहानंतर सोमवारी (10 ऑगस्ट) नवी दिल्लीत भव्य असा लग्नाचा स्वागत समारंभ (wedding reception) आयोजित करण्यात आला होता. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी हा स्वागत समारंभाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला सत्ताधारी असो किंवा विरोधक सर्व नेत्यांनी हजेरी लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अमित शहा, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह अनेक दिग्गज यावेळ उपस्थित होते. Supriya Sule daughter Revati Sule Reception
Comments are closed.