सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना फाशीची शिक्षा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद आणि त्यांचा लहान भाऊ माहेर अल असद यांना देशातील गृहयुद्धादरम्यान लाखो लोकांच्या नरसंहार प्रकरणी दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. सीरियातील एका न्यायालयाने आज याबाबत निर्णय जाहीर केला.

सीरियामध्ये बशर सरकारचे पतन झाल्यानंतर बशर आणि माहेर यांनी 2024मध्ये रशियामध्ये पलायन केले. दोघांनाही पुतीन सरकारने रशियात आश्रय दिला आहे. त्यांच्या अनुपस्थितीतच हा खटला चालला. याच प्रकरणात बशर यांचा मामे भाऊ अतीफ नजीब यालाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. अतीफ याला जानेवारी 2025मध्ये अटक करण्यात आली होती.

Comments are closed.