हिंदुस्थानी तरुणाचा माल्टामध्ये अपघाती मृत्यू, मृतदेह मायदेशी आणण्यासाठी मदतीचे आवाहन
हिंदुस्थानी तरुणाचा माल्टा येथे रस्ते अपघातात मृत्यू झाला. मोहम्मद अब्दुल जवाद (27) असे मयत तरुणाचे नाव आहे. मोहम्मद माल्टा येथे ट्रक चालकाचे काम करत होता. मोहम्मदचा मृतदेह मायदेशी आणण्यासाठी कुटुंबीयांनी मदतीचे आवाहन केले आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यातील रहिवासी असलेला मोहम्मद जवाद हा माल्टा येथे ट्रक चालकाचे काम करत होता. मंगळवारी सकाळी 11.45 च्या सुमारास कोर्मी भागात मोहम्मदच्या ट्रकने एका ट्रेलरला धडक दिली. यात मोहम्मदचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत व बचाव कार्य सुरू केले. मोहम्मदचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला. पोलीस अपघाताच्या कारणांचा तपास करत आहेत. मोहम्मदचा मृतदेह हिंदुस्थानात आणण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.
Comments are closed.