हॉटेलमध्ये गेल्यावर या वस्तू ढापू नका
सोशल मीडियावर काहीजण हॉटेल रुममधील वस्तू ढापत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होतात. हॉटेल रुमचे भाडे देत असल्याने त्या रुममध्ये असलेल्या बेडशीट, उशा, हेअर ड्रायर, ग्लास, टॉवेल, किटली, प्लेट्स, चमचे, हॅंगर,शॅम्पू, साबण, हँड क्लिनर या वस्तूही आपल्याच असा विचार करत या कृती केल्या जातात. पण त्यामुळे त्या व्यक्तीची बदनामी तर होतेच शिवाय तो ज्या गावातून, राज्यातून किंवा देशातून आलेला असतो त्यांचेही नाव खराब होते. हे टाळण्यासाठी आपल्याला ‘सिविक सेन्स’ म्हणजेच नागरी कर्तव्य किंवा सोप्या भाषेत ‘समाजभान असणे गरजेचे आहे. बरं आता हा सिविक सेन्स काही एका रात्रीत माणसाला येत नाही तर त्यासाठी लहानपणापासूनच तसे संस्कार त्याच्यावर करायला हवेत.
यासाठी प्रत्येकाला लहानपणापासूनच ट्रेन करायला हवं. पण याची दुसरी बाजू अशी की जर हॉटेलमध्ये गेल्यावर आई वडीलच जर तेथील वस्तू बॅगेत टाकत असतील तर मुलही उद्या १०० टक्के त्यांची कॉपी करणार. म्हणूनच शाळांमध्येही मुलांना बाहेरगावी गेल्यावर, हॉटेलमध्ये गेल्यावर कसं वागाव, कोणते एटिकेट पाळावेत ते शिकवायला हवं. जसे की हॉटेलमध्ये रुम घेतल्यावर काही वस्तू पाहुण्यांसाठी मोफत दिलेल्या असतात, तर काही वस्तू हॉटेलची मालमत्ता असतात. त्यामुळे त्या रूममधून घेऊन जाणे टाळावे.
या वस्तू नेऊ नयेत
टॉवेल आणि बाथरोब
उशा आणि ब्लँकेट
हेअर ड्रायर
कपड्यांचे हँगर — हॉटेलने परवानगी दिली नसेल तर
इस्त्री आणि इस्त्रीचा बोर्ड
टीव्हीचा रिमोट
रूममधील सजावटीच्या वस्तू, पेंटिंग किंवा आर्टवर्क
इलेक्ट्रिक केटल आणि इतर उपकरणे
ग्लास, कप आणि क्रॉकरी
इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा चार्जर
हॉटेलच्या मालकीच्या स्टेशनरी वस्तू आहेत. त्या घेऊन जाणे म्हणजे एकप्रकारे वस्तू लंपास करणे.
या वस्तू घेऊन जाऊ शकता
हॉटेलच्या पॉलिसीनुसार साबण, शॅम्पू, कंडिशनर, शॉवर कॅप, टूथब्रश किट आणि चप्पल यांसारख्या छोट्या कॉम्प्लिमेंटरी वस्तू घेऊन जाता येतात.
Comments are closed.