पाकिस्तानचा बलूचिस्तानवर एअर स्ट्राइक; 21 जणांचा मृत्यू, बीएलएकडून हल्ल्याला प्रत्युत्तर
पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला आहे. पाकिस्तानी सैन्याने सोराब आणि ग्वादरच्या आसपासच्या भागात केलेल्या हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू झाला असून यात महिला आणि छोटय़ा मुलांचाही समावेश आहे.
हल्ल्यांनंतर या भागातील इंटरनेट आणि दूरसंचार सेवा खंडित करण्यात आली. पाकिस्तानने अतिरेक्यांच्या ठिकाणांऐवजी लोकवस्तीत हल्ला केल्यानंतर अनेकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानकडून या लष्करी कारवाईबाबत कोणतीही अधिपृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. हल्ल्यामुळे सोराब आणि ग्वादरमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
स्थानिकांनी या लष्करी कारवाईचा निषेध केला आहे. या हल्ल्यानंतर ‘बलुच लिबरेशन आर्मी’ देखील आक्रमक झाली आहे. प्रत्युत्तर दाखल बीएलएने केलेल्या हल्ल्यात चागाई जिह्यात मध्यरात्री झालेल्या बॉम्बस्पह्टात एक पोलीस ठाणे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. तर, तीन सुरक्षा कर्मचारी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
Comments are closed.