गटारीच्या जेवणानंतर पोट साफ होत नाहीये?
आजपासून (13 ऑगस्ट) श्रावण सुरू झाला आहे. अनेकजण श्रावणात मांसाहार करत नाही. त्यामुळे श्रावण सुरू होण्याआधी ज्यादिवशी दीप अमावस्या असते त्यादिवशी गटारी साजरी करतात. गटारीला वेगवेगळ्या नॉनव्हेज पदार्थांवर ताव मारण्यात येतो. काहीजण मद्यसेवन देखील करतात. परंतू चिकन, मटण, फिश अशा तिखट तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो. ज्यामुळे पित्त, अपचन, छातीत जळजळ, आंबट ढेकर, पोट फुगणे, जुलाब आदी तक्रारी सुरू होतात. अशा तक्रारींवरील घरगुती उपाय काय आहे यावर एक नजर टाकूयात. stomach detox after Gatari
उपाय –
- झोपण्यापूर्वी अर्धा ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा ओवा किंवा जिरे उकळून प्यावे. ओव्यात थायमॉल आणि जिऱ्यात थायमोक्विनोन हे पाचक घटक असतात.
- आलं आणि पुदिन्याचा काढा प्या. आल्यातील जिंजरॉल पोटातील अन्नाची हालचाल सुधारतो आणि पुदिना पोटाच्या स्नायूंना शिथिल करतो, ज्यामुळे ऍसिडिटीची जळजळ थांबते.
- 1 ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हिंग आणि 1 चमचा बडीशोप टाकून घेतल्यास फुगलेले पोट हलके होते.
- जेवण झाल्यावर 10 मिनिटे व्रजासनात बसावे. यामुळे पोटाच्या भागातील रक्तप्रवाह वाढतो आणि पचन सुधारते.
- जेवण झाल्यावर लगेच झोपू नये. संथ गतीने 10 मिनिटे चालावे.
- गॅस आणि ॲसिडिटीसाठी लगेच तीव्र पेनकिलर्स घेऊ नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
जेवताना पुढील नियम पाळा
- नॉनव्हेज खाण्यापूर्वी काकडी, गाजर आणि टोमॅटोचे सलाड खावे. यातील तंतू मांसाहारातील फॅट्सचे पचन व्यवस्थित होते.
- अन्न नीट चावून खावे. तुम्ही जितके जास्त चावून खाल तितके तोंडात लाळ जास्त तयार होते. परिणामी पचन व्यवस्थित होते.
- शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासही दह्यामुळे मदत होते. दह्याचे सेवन केल्याने पोटफुगी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
हेही वाचा – Alcohol Hangover : गटारीचा हँगओव्हर घालवण्यासाठी काय करावं?
Comments are closed.