“बिअर प्यायची असेल तर प्या, मात्र….” कॅप्टन रूटने इंग्लंड संघावरील कर्फ्यु उठवला; एक अटही घातली

इंग्लंडच्या कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी घेतल्यानंतर जो रूटने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे खेळाडूंना आनंद होणार आहे. आता खेळाडूंच्या हॉटेलबाहेर थांबण्यावर किंवा विजयानंतरच्या जल्लोषावर पूर्वीसारखी वेळेची मर्यादा असणार नाही, मात्र यासाठी एक अटही घालण्यात आली आहे.

बेन स्टोक्सच्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतर इंग्लंडच्या कसोटी संघाची धुरा रूट सांभाळत आहे. 35 वर्षीय फलंदाजाची पुन्हा एकदा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्यासमोर आगामी पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका हे आव्हान असणार आहे. 19 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत तीन सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेदरम्यानची कोणतीही संचारबंदी नसणार असे स्पष्ट करण्यात आले आहे.

ऍशेस मालिकेदरम्यान इंग्लंड खेळाडूंच्या वर्तवणुकीवरून झालेल्या वादामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यावेळी अनेकांनी रात्री उशिरापर्यंत मद्यपान केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे बोर्डाने निर्बंध लादले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यानही स्टोक्स आणि गस ऍटकिन्सन यांनी नियमांचे उल्लंघन केले होते.

प्रत्येक गोष्टींवर निर्बंध घालणे अयोग्य- रूट
रूटला आता खेळाडूंसोबत वेगळ्या मार्गाने पुढे जायचे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडूंनी आपापली जबाबदारी समजून घेतली पाहिजे, असे मत त्याने मांडले आहे.

आता कर्फ्यू असणार नाही. मला नाही वाटत या गोष्टीला मोठा मुद्दा बनवण्याची आवश्यकता आहे. हुशारीने वागा, स्वत:ची आणि इतरांची काळजी घ्या, असे रूटने स्काय स्पोर्ट्स क्रिकेट पॉडकास्टवर म्हटले आहे.

केवळ बिअर प्यायची आहे, म्हणून सामना जिंकल्यानंतर खेळाडूंना आनंद साजरा करता येणार नाही, असे त्यांना वाटू नये. योग्य वेळी थोडा आरामही महत्त्वाचा असतो. शेवटी आपण सर्व माणसेच आहोत, असेही रूटने म्हटले आहे. हे वक्तव्य करताना त्याने त्याच्या संघसहकाऱ्यांना एक आठवण करून दिली की, इंग्लंडचे प्रतिनिधित्व करत आहात हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.

रूटच्या वक्तव्यावरून असे कळते की, इंग्लंडच्या खेळाडूंना स्वातंत्र असले तरी, मैदानाबाहेरील त्यांच्या वागणुकीची जबाबदारी त्यांचीच असेल.

Comments are closed.