US Plane Crash – टेक्सासमध्ये अमेरिकन लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, दोन वैमानिकांचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टेक्सासमधील सालाडो येथे अमेरिकन लष्कराचे अपाचे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला. सालाडो हे ऑस्टिनच्या उत्तरेला सुमारे 50 मैल अंतरावर आहे. शेरीफचे प्रवक्ते क्लिफ कोलमन यांच्या माहितीनुसार, दुपारी 1.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) 911 वर अपघाताचा कॉल आला. अधिकारी घटनास्थळी पोहोचले असता दोन्ही सैनिकांना मृत घोषित केले.

टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, हे अमेरिकन लष्कराचे अपाचे हेलिकॉप्टर फोर्ट हूड येथे तैनात होते. या घटनेत कोणत्याही इमारतींचे नुकसान झाले नाही आणि इतर कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही, असे कोलमन यांनी सांगितले.

Comments are closed.