भारताला टार्गेट करत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सचा नवा ‘बिझनेस’! स्टार्क-हिली-स्थळेकर मैदानाबाहेर एकत्र

ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील तीन प्रतिष्ठित व्यक्ती, मिचेल स्टार्क, एलिसा हिली आणि लिसा स्थळेकर यांनी नव्या उद्योगाची सुरूवात केली आहे. तिघांनी ‘कॉर्क्ड विलो’ या व्यवसायाची सुरूवात केली आहे. जागतिक स्तरावर वेगाने वाढणाऱ्या वाईन बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारताला, ऑस्ट्रेलियातील नामांकित वायनरींशी जोडून, भारतात ऑस्ट्रेलियन वाईनला प्रोत्साहन देणे हे या मागचे उद्दिष्ट असल्याचे दिसते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुवा म्हणून काम करत, ‘कॉर्क्ड विलो’ आपल्या नेटवर्कचा आणि स्थानिक बाजारपेठेच्या सखोल ज्ञानाचा उपयोग करून ऑस्ट्रेलियन वायनरींना आयातदार, हॉस्पिटॅलिटी भागीदार आणि ग्राहकांशी अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यास मदत करते.
शिक्षण, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून, ही कंपनी ऑस्ट्रेलियन वाईन उत्पादकांसाठी भारताच्या वेगाने विकसित होत असलेल्या वाइन बाजारपेठेत विस्तार आणि यशाच्या नव्या संधी निर्माण करत आहे.
कॉर्क्ड विलोसोबतच ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध आणि पुरस्कृत ‘हाऊस ऑफ अरास’ याच्यासोबत एक भागीदारी करत आहे. ‘हाऊस ऑफ अरास’ने पारंपरिक पद्धतीच्या स्पार्कलिंग वाईन म्हणून जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. याचवर्षी या वायनरीने एक ऐतिहासिक टप्पा गाठला. त्यांच्या एका वाइनला ‘रॉबर्ट पार्कर वाईन ऍडव्होकेटकडून 100 गुण मिळाले. अशी कामगिरी करणारी ती ऑस्ट्रेलियामधील पहिलीच स्पार्कलिंग वाईन ठरली.
कॉर्कड विलो ऑस्ट्रेलियन वाईनला क्रीडा, व्यवसाय आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील विस्तृत नेटवर्कसोबत जोडले गेले आहे. ऑस्ट्रेलियन वाइनरींना भारतीय बाजारपेठेत दीर्घकाळ टिकणारे संबंध आणि शाश्वत वाढ निर्माण करण्यास मदत करणे, हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यातच त्याच्याशी जोडले गेलेले तीन ऑस्ट्रेलियन खेळाडू यांची भर पडल्याने त्याचा प्रसार अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे.
कॉर्क्ड विलोचा प्रसार आणि विस्तार करताना ते ऑस्ट्रेलियन वाईननिर्मितीची विविधता, गुणवत्ता आणि नावीन्य दर्शविणाऱ्या आघाडीच्या ऑस्ट्रेलियन वाइनरींसोबत भागीदारी सुरू ठेवणार आहे. त्यामुळे उत्पादकांना भारतातील वाईनप्रेमींपर्यंत पोहोचण्यासाठी नवीन मार्ग सापडतील. (Australian cricketers’ new ‘business’ targeting India! Mitchell Starc, Alyssa Healy and Lisa Sthalekar together off the field.)
Comments are closed.