Tiranga Rules : तिरंगा फडकवताना या चुका करू नका; ध्वजसंहितेतील महत्त्वाचे नियम




तिरंगा फडकवताना ‘या’ चुका टाळा


15 ऑगस्ट आला की प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना जागी होते. घराच्या गॅलरीत, सोसायटीच्या आवारात, शाळेत किंवा कार्यालयात अभिमानाने तिरंगा फडकवला जातो. पण हा केवळ तीन रंगांचा झेंडा नाही तर तो देशाच्या स्वाभिमानाचे आणि असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे प्रतीक आहे. त्यामुळे तिरंगा फडकवताना काही महत्त्वाचे नियम पाळणेही तितकेच गरजेचे आहे. Indian Flag Code Rules

भारतीय ध्वजाच्या प्रदर्शनासाठी Flag Code of India, 2002 आणि Prevention of Insults to National Honour Act, 1971 मधील तरतुदी लागू आहेत. ध्वजसंहितेत 2021 आणि 2022 मध्ये बदलही करण्यात आले आहेत. नेमके काय आहेत नियम आणि आपण काय लक्षात घेणे महत्वाचे आहे जाणून घेऊयात.

तिरंगा फडकवताना ‘या’ चुका टाळा

1) फाटलेला किंवा मळलेला तिरंगा वापरू नका.
2) तिरंगा जमिनीला किंवा पाण्याला स्पर्श करू देऊ नका.
3) तिरंग्याचा वापर सजावटीच्या कापडासारखा करू नका.
4) तिरंग्यापेक्षा वर दुसरा झेंडा ठेवू नका.
5) तिरंग्यावर फुले, हार किंवा इतर वस्तू ठेवू नका.
6) तिरंगा कपडे किंवा इतर वस्तूंमध्ये चुकीच्या पद्धतीने वापरू नका.
7) तिरंगा उलटा लावू नका.
8) ध्वजाचा आकारही योग्य असावा.

तिरंग्याचा सन्मान कसा राखायचा?
15ऑगस्टला घरावर तिरंगा फडकवताना तो स्वच्छ, सुस्थितीत आणि योग्य पद्धतीने लावा. सध्या लागू असलेल्या नियमांनुसार, नागरिक, खासगी संस्था आणि शैक्षणिक संस्था सर्व दिवस आणि प्रसंगी तिरंगा फडकवू शकतात, मात्र त्याचा सन्मान आणि प्रतिष्ठा कायम राखणे आवश्यक आहे. 2022 च्या दुरुस्तीनंतर घरावर किंवा खुल्या ठिकाणी प्रदर्शित केलेला राष्ट्रध्वज दिवस-रात्र फडकवता येतो.



Comments are closed.