गरम पदार्थ फ्रिजमध्ये ठेवले तर काय होते?
फ्रिज भाज्या, फळे, दूध आणि इतर पदार्थ ठेवण्यासाठी उपयोगी पडतो, पण अनेकदा घरात शिल्लक राहिलेले पदार्थ देखील फ्रिजमध्ये ठेवले जातात. पण अनेकदा हे अन्नपदार्थ गरमच फ्रिजमध्ये ठेवले जातात. पण त्याचे परिणाम काय होतील याबद्दल फार कोणीही विचार करत नाही. त्यामुळे आजच्या लेखात गरम पदार्थ ठेवल्याने फ्रिजचं खरंच नुकसान होते का? अन्नपदार्थही खराब होतात का? या सर्वाविषयी जाणून घेऊयात.
आरोग्यावर काय परिणाम होतात?
- गरम अन्न फ्रिजमध्ये ठेवल्याने फ्रिजमधील आतील तापमान अचानक वाढते. यामुळे फ्रिजमध्ये आधीपासून ठेवलेल्या इतर थंड पदार्थांचे तापमानही बदलते. परिणामी विषारी बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात.
- अन्नातील ओलसरपणा आणि वाढलेल्या तापमानामुळे डेंजर झोन तयार होतो, ज्यामुळे अन्न लवकर खराब होऊन फूड पॉयझनिंगचा धोका निर्माण होतो.
हेही वाचा – रात्री झोपण्याआधी आपण करत असलेल्या 7 छोट्या चुका
फ्रिजचेही होते नुकसान
- जेव्हा तुम्ही गरम अन्नपदार्थ फ्रिजमध्ये ठेवता तेव्हा गरम अन्न थंड करण्यासाठी फ्रिजच्या कॉम्प्रेसरला दुप्पट वेगाने काम करावे लागते. यामुळे विजेचा वापर वाढतो आणि वीज बिल जास्त येते.
- कॉम्प्रेसरवर सतत अतिरिक्त ताण आल्यामुळे फ्रिज लवकर खराब होण्याची शक्यता दुप्पटीने वाढते.
योग्य पद्धत कोणती?
- कोणताही पदार्थ रूम टेम्परेचरवर थोडे थंड होऊ द्या आणि नंतरच फ्रिजमध्ये ठेवा.
- अन्न बाहेर ठेवताना ते 2 तासांपेक्षा जास्त वेळ उघडे किंवा बाहेर राहणार नाही याची काळजी घ्यावी.
- अन्न नेहमी हवाबंद डब्यातच फ्रिजमध्ये ठेवावे.
हेही वाचा – स्वीमिंग केल्यानंतर मुलं आजारी का पडतात ? ही आहेत कारणे
Comments are closed.