Ratnagiri News – घाटीवळे ब्राह्मणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचा भाग कोसळला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे ब्राह्मणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा काही भाग मुसळधार पावसामुळे अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने ज्या जीर्ण भागाची पडझड झाली, त्या भागात शाळेचे वर्ग भरवले जात नव्हते आणि ही दुर्घटना रात्रीच्या वेळी घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी टळली आहे. या मोठ्या दुर्घटनेतून विद्यार्थी बचावले असले, तरी या नादुरुस्त आणि जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शाळेची इमारत कधीही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने पालकांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या शाळेच्या इमारतीची पाहणी करून योग्य ती कारवाई करावी आणि पुढील अनर्थ टाळावा, अशी आक्रमक मागणी आता ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

Comments are closed.