AUS Vs BAN – बांगलादेश तिसऱ्या दिवशी 400 पार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बांगलादेशने सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही ऑस्ट्रेलियाला चांगलेच झुंजवले. 8 बाद 380 अशी बांगलादेशची दिवसाच्या सुरुवातीला अवस्था होती. त्यामुळे ते 400 धावा पार करणार नाही, असे सर्वांना वाटत होते. पण बांगलादेशच्या तळाच्या फलंदाजांनी झुंजार खेळ केला आणि संघाला 426 अशी धावसंख्या उभारून दिली. तिसऱ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाची 4 बाद 161 अशी अवस्था असून ते 67 धावांनी अजूनही पिछाडीवर आहेत.

बांगलादेशच्या मेहंदी हसन मिराझने ऑस्ट्रेलियाची चांगलीच त्रेधा उडवली. मेहंदीने पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 65 धावांची खेळी साकारली. त्यामुळे संघाला 400 धावांचा पल्ला गाठता आला. त्यानंतर तास्किन अहमदने नाबाद 14 धावा करत संघाला 426 धावांपर्यंत पोहोचवले. बांगलादेशला प्रत्युतर देताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात वाईट झाली. नवव्या चेंडूवरच त्यांना पहिला धक्का बसला. पण त्यानंतर स्टीव्हन स्मिथ आणि पॅमेरून ग्रीन यांची चांगली जोडी जमली होती. पण स्मिथ 44 धावांवर बाद झाला आणि ही जोडी फुटली. पण ग्रीन 43 धावांवर नाबाद असून आता चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलिया बांगलादेशला किती धावांचे आव्हान देते, याची उत्सुकता सर्वांना असेल.

Comments are closed.