गोंदियात बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला, दोघे गंभीर जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अर्जुनी मोरगाव ते इटखेडा मार्गावरील संभाजीनगर जंगल परिसरात धावत्या दुचाकीवर बिबटय़ाने झडप घालत हल्ला केला. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रणय बोदेले (24) आणि बालकिशोर राऊत (47) अशी या जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांवर अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रणय बोदेले आणि बाल किशोर राऊत हे दोघेही दुचाकीने सायंकाळी अर्जुनी मोरगावरून वडेगाव रेल्वे येथे जात होते. रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने त्यांच्या दुचाकीवर झडप घातली. या ते दोघेही खाली पडले आणि जखमी झाले. त्यांनी आरडाओरड करत बिबटय़ाच्या तावडीतून सुटका करत तेथून पळ काढला. गावाजवळ पोहोचल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती गावकऱयांना दिली. या घटनेमुळे परिसरातील गावकऱयांमध्ये आणि या मार्गावरून ये-जा करणाऱया नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाच्यावतीने सदर ठिकाणी वन कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.

Comments are closed.