नागपुरात सोन्यापाठोपाठ केशरची सर्वाधिक स्मगलिंग
स्मगलिंगसाठी नेहमीच चर्चेत असणाऱया सोन्यापाठोपाठ गरम मसाल्यात अग्रस्थानी असणाऱया केशरनेही भाव खाल्ल्याचे एका माहितीत उघड झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या साडेतीन वर्षांत तब्बल आठ किलो केशर जप्त करण्यात आले आहे. याची किंमत सुमारे साडेसतरा लाख रुपये आहे. येथे येणारे प्रवाशी ही तस्करी करीत असल्याने हे विमानतळ तस्करीचे हब ठरत आहे.
नागपूर विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून होणाऱ्या तस्करीची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. जानेवारी 2023 ते जुलै 2026 या साडेतीन वर्षांच्या कालावधीत सीमाशुल्क विभागाने सर्वाधिक सोने जप्त केले. त्यानंतर वारंवार जप्त होणाऱया तस्करीच्या वस्तूंमध्ये केसरचा क्रमांक लागतो. विविध देशांतून तसेच आखाती देशांमधून येणाऱया प्रवाशांकडून हे केसर आणले जात असल्याचे अधिकाऱयांच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
देशांतर्गत केसर उत्पादकांचे संरक्षण करण्यासाठी त्यावर 40 टक्क्यांहून अधिक सीमाशुल्क आकारले जाते. त्यामुळे परदेशातून कमी दरात केसर आणून देशांतर्गत बाजारपेठेत विक्री केले जात आहे.
Comments are closed.