स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला जाताना तीन विद्यार्थिनींना ट्रव्हल्सने चिरडले, हिंगणघाट शहरावर दुःखाचा डोंगर
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर पडलेल्या तीन शाळकरी विद्यार्थिनींच्या दुचाकीला एका सुसाट खासगी ट्रव्हल्सने चिरडल्याची धक्कादायक घटना आज घडली. या भीषण अपघातात तिन्ही अल्पवयीन विद्यार्थिनींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
समृद्धी धामसे, आरुही चवरे आणि मिसबा शेख अशी या दुर्घटनेत बळी पडलेल्या मुलींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी या तिघीही मैत्रिणी एकाच दुचाकीवरून स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बाहेर निघाल्या होत्या. त्यांचा प्रवास आंबेडकर शाळेजवळ आला असतानाच, पाठीमागून अत्यंत वेगाने आलेल्या एका खासगी ट्रव्हल्स बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना अपयश
बसची धडक इतकी भयंकर होती की, दुचाकीवरील तिन्ही मुली थेट रस्त्यावर फेकल्या गेल्या. यात त्यांना अत्यंत गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलींना त्वरित जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
Comments are closed.